हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:25 PM2021-02-25T13:25:26+5:302021-02-25T13:28:00+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एका चर्चेदरम्यान अजब विधान केले आहे. या विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणून ओळखला जातो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

yogi adityanath claims if a citizen of india goes to haj it is also identified as hindu | हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ

हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ

Next
ठळक मुद्देहिंदू शब्दाचा एवढा राग का? - योगी आदित्यनाथराम मंदिर संपूर्ण देशाचा गौरव - योगी आदित्यनाथकेरळ हे सनातनाचे आस्था केंद्र - योगी आदित्यनाथ

प्रयागराज : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एका चर्चेदरम्यान अजब विधान केले आहे. या विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणून ओळखला जातो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (yogi adityanath claims if a citizen of india goes to haj it is also identified as hindu)

अखंड भारतातील कोणताही नागरिक जेव्हा हज किंवा अन्य कारणांसाठी परदेशात जातो. तेव्हा त्याला हिंदू म्हणूनच ओळखले जाते, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. हिंदू हा धर्म नाही. हिंदू एक जीवन पद्धती आहे. ती एक संस्कृती आहे. सनातन हा धर्म आहे. आम्हाला आमच्या हिंदू म्हणून असलेल्या ओळखीबाबत अभिमान वाटतो, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. 

राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर

हिंदू शब्दाचा एवढा राग का?

हिंदूला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करणारे लोक अयोध्या, मथुरा, काशी यांचा आदर करत नाहीत. हिंदू शब्दाचा एवढा राग कशासाठी केला जातो, असा प्रश्न उपस्थित करत हिंदू म्हणजे कोणताही एक धर्म नाही. सनातन हा धर्म आहे, असे योगी म्हणाले. 

राम मंदिर संपूर्ण देशाचा गौरव

अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी करण्यात आली असून, हा संपूर्ण देशाचा गौरव आहे. संपूर्ण जगाने श्रीरामांना स्वीकारले आहे. मात्र, आपल्याच देशातील काही जण श्रीरामांचा  द्वेष करतात. रामायण काळात राक्षसही असेच करत होते, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना लगावला. 

केरळ हे सनातनाचे आस्था केंद्र

आदि शंकराचार्यांचा जन्म केरळमध्ये झाला होता. केरळला आम्ही सनातन आस्था केंद्र मानतो. आदि शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना करत सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला आहे, असे सांगत केरळमध्ये काँग्रेस फाळणीचे राजकारण करत आहे. काँग्रेसच्या याच विचारसरणीमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. फाळणीची मानसिकता चिंता वाढवणारी आहे, असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला.

Web Title: yogi adityanath claims if a citizen of india goes to haj it is also identified as hindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.