'येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये बरंच काही होणार आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 10:18 AM2019-02-08T10:18:51+5:302019-02-08T10:37:15+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही' असे वक्तव्य केले.

yogi adityanath gave statement on ram mandir in poorniya | 'येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये बरंच काही होणार आहे'

'येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये बरंच काही होणार आहे'

Next
ठळक मुद्दे 'राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही'पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे गुरुवारी (8 फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते त्यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते. बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आलेले परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले. 

पूर्णिया/पाटणा - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये गुरुवारी 'राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही' असे वक्तव्य केले आहे. 

पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे गुरुवारी (8 फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.  'भगवान रामाच्या जन्मस्थानी येणारे भाविक आता अयोध्येत येतात. फैजाबाद जिल्ह्यात जात नाहीत आणि कुंभ मेळ्याला येणारे प्रयागराजला येतात अलाहाबादला नव्हे. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशमध्ये खूप काही होणार आहे. चिंता करू नका' असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

बिहारमध्ये नितीशकुमार आणि सुशील मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कामगिरीमुळे सामान्य लोकांचे बिहारबाबतच्या धारणेत परिवर्तन झाले आहे. आम्ही विरोधकांसारखे देश तोडण्याची भाषा करत नाही, असेही योगी म्हणाले. तसेच आम्ही शहीद होणाऱ्या आमच्या प्रत्येक जवानांसाठी सीमेपलिकडचे 100 सैनिक मारण्यावर विश्वास ठेवतो, असे सांगितले. यावेळी त्यांनी बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आलेले परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारसाठी यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून करण्यात आला आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त निधी निश्चित करण्यात आला आहे. तसेच, गोसंवर्धनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्यात गोशाळा व्यवस्थापनासाठी 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. योगी सरकारने यावेळी 4 लाख 70 हजार 684 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

Web Title: yogi adityanath gave statement on ram mandir in poorniya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.