योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 07:13 PM2020-04-19T19:13:58+5:302020-04-19T19:26:23+5:30

गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

Yogi Adityanath government will provide employment to more than five lac migrant workers sna | योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार

Next
ठळक मुद्देयासाठी योगी आदित्यनाथ यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहेही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेलएमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल

लखनौ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर मजूर बेरोजगार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथसरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

ही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. या समितीचे अध्यक्ष कृषि उत्पादन आयुक्त असतील. तसेच ग्राम विकास, पंचायती राज, एमएसएमई तसेच कौशल्य विकासच्या मुख्य सचिवांचा यात समावेश असेल. ही समिती ओडीओपीअंतर्गत रोजगार निर्मितीबरोबरच बँकांच्या माध्यमाने लोन मेळावे आणि रोजगार मेळावेही आयोजित करेल. यामुळे लोकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळतील. या शिवाय ही समिती रोजगाराच्या अधिकाधिक संधी कशा निर्माण होतील यासंदर्भातही सूचना देईल. एवढेच नाही, तर एमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने रिव्हॉल्विंग फण्डमध्ये वाढ केली आहे. याच्या माध्यमातून महिला स्वयंसेवी गटांच्या विविध प्रकारच्या कार्यांना उत्तेजन देऊन रोजगार निर्मिती केली जाईल. यात शिलाई, लोणचे, मसाला तयार करणे यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. या महिला जे तयार करतील त्याचे मार्केटिंग ओडीओपीच्या माध्यमाने केली जाईल. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सूचना दिला आहे, की 20 एप्रिलनंतर ज्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे, केवळ अशाच ठिकाणी काही प्रमाणात सूट असेल. मात्र, जेथे 10 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्थ आहेत, तेथे तीन मेपर्यंत बंद असेल. कोरोनाचा फैलाव कोणत्याही परिस्थितीत रोखायचा आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Yogi Adityanath government will provide employment to more than five lac migrant workers sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.