yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता बनवणारी हिंदू युवा वाहिनी मोजतेय अखेरच्या घटका, अनेक पदाधिकारी सपामध्ये दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 03:49 PM2022-01-01T15:49:39+5:302022-01-01T16:02:28+5:30

Hindu Yuva Vahini News: Yogi Adityanath यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे.

Yogi Adityanath: Hindu yuva vahini, which is making Yogi Adityanath a staunch pro-Hindu leader, is counting the last elements, many office bearers have joined SP. | yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता बनवणारी हिंदू युवा वाहिनी मोजतेय अखेरच्या घटका, अनेक पदाधिकारी सपामध्ये दाखल 

yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता बनवणारी हिंदू युवा वाहिनी मोजतेय अखेरच्या घटका, अनेक पदाधिकारी सपामध्ये दाखल 

Next

गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना भाजपाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. तसेच या संघटनेतील बहुतांश पदाधिकारी हे समाजवादी पक्षात गेले आहेत. तर या संघटनेकडे लक्ष देणारा कुणीही उरलेला नाही. 
योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना २००२ मध्ये केली होती. राष्ट्रविरोधी कृत्यांना रोखणे हे या संघटनेचे उद्दीष्ट होते. २००७ मध्ये योगी आदित्यनाथ यांना ११ दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. हिंदू युवा वाहिनीचे वर्चस्व आहे.

हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष असलेल्या सुनील सिंह आणि त्यांच्यासोबत सौरभ विश्वकर्मा, चंदन विश्वकर्मा यांनी १५ वर्षांपर्यंत हिंदुत्वाचा झेंडा हिंदू युवा वाहिनीने उचलून धरला होता. मात्र २०१७च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपादरम्यान त्यांचे योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांनी संघटनेच्या बाहेर काढले होते. आता हे तिन्ही नेते समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत.

हिंदू युवा वाहिनीच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ हे सीएम बनल्यानंतर हिंदू युवा वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले. हळुहळू जिल्हा कार्यकारिणी भंग करण्यात आली. त्यामुळे सर्व कार्यकर्ते हे समाजवादी पक्षात जाऊ लागले. या क्रमामध्ये २०१८ मध्ये उत्तर प्रदेशमधील बलरामपूर, मऊ, आझमगड या जिल्ह्यांमधील कार्यकारिणी भंग करण्यात आल्या. या भागांमध्ये या संघटनेची भक्कम जाळे होते.  

 आरएसएसच्या आदेशांनुसार हिंदू युवा वाहिनीला भंग करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून या संस्थेच्या विस्ताराला ब्रेक लागला होता. तसेच समांतर हिंदुत्ववादी संघटना भविष्यात पक्षासाठी डोकेदुखी ठरली असती, त्यामुळे ही संघटना आटोपती घेण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Yogi Adityanath: Hindu yuva vahini, which is making Yogi Adityanath a staunch pro-Hindu leader, is counting the last elements, many office bearers have joined SP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.