योगी आदित्यनाथ हिंदुत्त्वाचा नाही, राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 08:54 PM2017-10-14T20:54:19+5:302017-10-14T20:58:53+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाधानी असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे.

Yogi Adityanath is not Hindutva, face of nationalism - Rashtriya Swayamsevak Sangh | योगी आदित्यनाथ हिंदुत्त्वाचा नाही, राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

योगी आदित्यनाथ हिंदुत्त्वाचा नाही, राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाधानी असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. योगी आदित्यनाथ हे हिंदुत्त्वाचा नाही तर राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघकडून समजलं जात आहे.

भोपाळ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाधानी असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. योगी आदित्यनाथ हे हिंदुत्त्वाचा नाही तर राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघकडून समजलं जात आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा समारोप शनिवारी झाला. याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांनी या संदर्भातले वक्तव्य केलं आहे.
 

‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोस्टर बॉय प्रमाणे समोर आणलं जातं आहे. निवडणुकांचा प्रचार किंवा इतर कोणताही कार्यक्रम त्यात योगी आदित्यनाथ असतातच. आजही ते हिंदुत्त्वाचा चेहरा आहेत का?’ असा प्रश्न समारोप कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला  होता. ‘योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, पूर्ण जबाबदारीने ते आपले म्हणणे मांडतात. त्याचमुळे ते हिंदुत्त्वाचा नाही तर राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत,असं उत्तर सुरेश भय्याजी जोशी यांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी राष्ट्रीयत्त्वाचा चेहराच महत्त्वाचा आहे. सत्तेवर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका मांडली पाहिजे, नेमके हेच योगी आदित्यनाथ करत आहेत म्हणूनच ते राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत, असंही ते म्हणाले

काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये झालेल्या भाजपाच्या जनरक्षा यात्रेत योगी आदित्यनाथ यांनी सहभाग घेतला होता. तसंच गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ३ दिवसांचा गुजरात दौराही केला. अमेठी येथील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमातही योगी आदित्यनाथ यांची हजेरी होती. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी या त्यांच्या मतदार संघात काहीही विकास केला नसल्याची टीका यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केली होती. 

Web Title: Yogi Adityanath is not Hindutva, face of nationalism - Rashtriya Swayamsevak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.