Yogi Adityanath Oath Ceremony : 'या' ठिकाणी होणार योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी; 1 लाख लोकांना बसता येणार, हेलिपॅडपासून 1000 वाहनांच्या पार्किंगची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:42 PM2022-03-16T14:42:35+5:302022-03-16T14:51:04+5:30

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मोठ्या संख्येने भाजप नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

yogi adityanath oath taking ceremony will held in atal bihari vajpayee ekana cricket stadium | Yogi Adityanath Oath Ceremony : 'या' ठिकाणी होणार योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी; 1 लाख लोकांना बसता येणार, हेलिपॅडपासून 1000 वाहनांच्या पार्किंगची सोय

Yogi Adityanath Oath Ceremony : 'या' ठिकाणी होणार योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी; 1 लाख लोकांना बसता येणार, हेलिपॅडपासून 1000 वाहनांच्या पार्किंगची सोय

Next

लखनऊ : उत्तर प्रदेशात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. होळीनंतर योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 21 मार्च रोजी शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शपथविधीसाठी स्मृती उपवनऐवजी अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. स्टेडियममध्ये शपथ घेण्यामागचे कारण म्हणजे हा ऐतिहासिक विजय भव्य करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मोठ्या संख्येने भाजप नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 37 वर्षांनंतर एका पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे. अशा परिस्थितीत भाजप या ऐतिहासिक सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यात व्यस्त आहे.

भाजपने शपथविधीसाठी अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची निवड केली आहे, कारण येथे जवळपास एक लाख लोक सहज बसू शकतात. याशिवाय, या स्टेडियमच्या आवारात एक हजार चारचाकी आणि पाच हजार दुचाकी वाहने पार्किंग करता येतील.तसेच, गरज भासल्यास स्टेडियमच्या आवारात तात्पुरते हेलिपॅडही उभारले जाऊ शकते. स्टेडियमच्या आत 2 मोठ्या एलईडी स्क्रीन देखील आहेत, जेणेकरून शपथविधी थेट दाखवता येईल.

योगी आदित्यनाथ आज दिल्लीत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपला 255 आणि सहयोगीपक्षांसह 273 जागा मिळाल्या आहेत. भाजपने यापूर्वीच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून जाहीर केले आहे. अशाच मुख्यमंत्री निवडीच्या औपचारिक प्रक्रियेसाठी अमित शहा आणि रघुबर दास होळीनंतर लखनऊला येणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्लीत पोहोचणार असून, तेथे भाजप हायकमांडसोबत बैठक घेऊन मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

Web Title: yogi adityanath oath taking ceremony will held in atal bihari vajpayee ekana cricket stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.