Yogi Adityanath Oath Ceremony : 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...', योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 04:50 PM2022-03-25T16:50:06+5:302022-03-25T16:51:06+5:30

Yogi Adityanath Oath Ceremony : राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. 

Yogi Adityanath takes oath as the Chief Minister of Uttar Pradesh for the second consecutive term | Yogi Adityanath Oath Ceremony : 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...', योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ 

Yogi Adityanath Oath Ceremony : 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...', योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ 

Next

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नव्या सरकारचा शपथविधी सोहळा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर पार पडला. योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. 

योगी सरकारमध्ये केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ब्रजेश पाठक हे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. याचबरोबर, सुरेश कुमार खन्ना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  सूर्य प्रताप शाही,  स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, चौधरी लक्ष्मीनारायण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भुपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभोर, जितेन प्रसाद, राकेश साचेन, जयवीर सिंह, धरम पाल सिंह, नांद गोपाल गुप्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.  

गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा भव्य आणि अविस्मरणीय होण्यासाठी भाजपने जय्य्त तयारी केली होती. 

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपसाशित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योजक, साधू-महंतांना निमंत्रण देण्यात आले होते. एवढेच नव्हे तर, बॉलिवूडमधील अभिनेते-अभिनेत्रींनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत आले आहे. योगी आदित्यनाथ हे 37 वर्षातील पहिले मुख्यमंत्री आहेत, जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक टर्म पूर्ण करून पुन्हा सत्तेवर विराजमान झाले आहेत. 

Web Title: Yogi Adityanath takes oath as the Chief Minister of Uttar Pradesh for the second consecutive term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.