Yogi Adityanath: योगींची मोठी घोषणा, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:53 PM2022-05-28T12:53:14+5:302022-05-28T13:03:14+5:30
युपीचे अर्थमंत्री विनोद खन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी 6 लाख 15 हजार 518 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये निराधार महिला, वृद्ध, निवडक विद्यार्थी यांना पेन्शन- स्कॉलरशीप जाहीर केली आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघासह आपल्या मतदारसंघासाठीही मेट्रोची घोषणा केली आहे. आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये योगींनी आश्वासनांच्या पूर्ततेकडे वेगाने आगेकूच केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे राज्यातील युवकांच्या नोकरीसंदर्भातही त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
युपीचे अर्थमंत्री विनोद खन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी 6 लाख 15 हजार 518 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये वृद्धांना १००० रुपये पेन्शन, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 5 लाखांची नुकसान भरपाई, विधवा महिलांना 1 रुपये पेन्शन आदी घोषणा केल्या आहेत. त्यानंतर, विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी रोजगारासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सरकारचा प्लॅनच सांगून टाकला.
सरकार युवाओं के लिए सजग है।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) May 27, 2022
उत्तर प्रदेश का युवा पहचान के संकट से मुक्त है। देश व दुनिया में अपनी प्रतिभा का लोहा मनवा रहा है।
हम रोजगार कार्ड जारी करने जा रहे हैं। हर परिवार के एक सदस्य को रोजगार से जोड़ेंगे: #UPCM@myogiadityanathpic.twitter.com/0tfKtRaFwf
युवकांसाठी सरकार सज्ज आहे, त्यांच्या रोजगारासाठी सरकारने काही योजना तयार केल्या आहेत. सरकारकडून रोजगार कार्ड जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्यात येईल. आम्ही पोलीस खात्यात 5 लाख नोकऱ्या दिल्या, पण एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. योग्येतनुसार उमेदवारांची तेथे निवड झाली आहे. राज्यात 1 कोटी 61 लाख युवकांना रोजगार देण्यात येणार असून 60 लाख स्वयंरोजगाराचीही योजना असल्याचं योगींनी विधानसभेत सांगितलं.
4 लाख रोजगार निर्मित्तीचे उद्दिष्ट
अनाथ मुलांना सहावी ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षणासाठी 300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेसाठी 600 कोटी रुपये देण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरणांतर्गत पाच वर्षांत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चार लाख लोकांना रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बेरोजगारीचा दर जून 2016 मध्ये 18 टक्के होता, तो एप्रिल 2022 मध्ये तो 2.9 टक्क्यांवर आला आहे. 4.22 लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.