योगी आदित्यनाथांचा धडाकेबाज निर्णय, 1 हजार रोडरोमियोंविरोधात कारवाई
By admin | Published: March 23, 2017 10:50 AM2017-03-23T10:50:57+5:302017-03-23T11:11:20+5:30
उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यानंतर महिला आणि तरुणींसोबत होणार छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी अॅन्टी रोमिया स्क्वॉड स्थापन करण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 23 - उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यानंतर महिला आणि तरुणींसोबत होणार छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी अॅन्टी रोमिया स्क्वॉड स्थापन करण्यात आले आहे. या स्क्वॉडकडून पहिल्या दोन दिवसांतच धडक कारवाई करत 1000 हून अधिक रोडरोमियोंविरोधात कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात सध्या अॅन्टी रोमियो ऑपरेशन सुरू आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत 1000 हून अधिक रोडरोमियांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. काही तरुणांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. तर काहींवर दंड ठोठावून चेतावणी देऊन सोडण्यात आले.
लखनौ झोनचे पोलीस महानिरीक्षक ए. सतीश गणेश यांनी सांगितले की, छेडछाडीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, शाळा आणि कॉलेज प्रशासनाकडून अॅन्टी रोमियो स्क्वॉडच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूरमधील शाळा प्रशासनाकडूनही या उपक्रमाची स्तुती करण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी सांगितले की, महिला आणि तरुणींना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटावे, हा अॅन्टी रोमियो स्क्वॉड स्थापण्याचा मुख्य उद्देश होता. मित्र, ओळखीच्या लोकांसोबत सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या महिलेला-तरुणीला त्रास दिला जाऊ नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.