यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:05 PM2020-08-19T16:05:29+5:302020-08-19T16:29:08+5:30

एन्काऊंटरमध्ये २,३०० हून अधिक आरोपी आणि ९०० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत.

yogi government up police encounter policy asaduddin owaisi | यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा

Next
ठळक मुद्देएका अहवालानुसार मार्च २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारची स्थापना झाल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम राबविली गेली.

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम)  प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊंटर पॉलिसीवर सवाल करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एन्काऊंटरसह नियम आणि योग्य प्रक्रियेत बदल केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

योगी सरकारवर आरोप करीत असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "ही केवळ औपचारिकता नाही. जुलमी सरकारपासून आपले रक्षण करण्यासाठी हाच मूळ आधार आहे. कोणालाही शिक्षा करण्याची ताकद पोलिसांना नाही. उत्तर प्रदेश वगळता, कोठे पुरावाशिवाय एन्काऊंटर होतो?"

अनेक अशी उदाहरणे आहेत की, ज्यामध्ये पोलिसांच्या भीतीमुळे एन्काऊंटर पीडित कुटुंबीयांना या घटनेला आव्हान देण्याची भीती वाटते. काही घटनांमध्ये, यूपी पोलिसांनी कथितरित्या पीडित कुटुंबीयांविरोधात कारवाई केली. यामध्ये पीडित कुटुंबीयांची घरे पाडण्याची कारवाई आहे, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर सुद्धा निशाणा साधला. यावेळी जातीय आणि जातीवादी संस्था कशी तयार झाली. हे उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखवून दिले आहे. आपला हिंदुत्वाचा वैचारिक अजेंडा पुढे नेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस योगी सरकारच्या हातातील कठपुतली बनले आहेत, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एका अहवालानुसार मार्च २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारची स्थापना झाल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम राबविली गेली. या अनुषंगाने राज्यात गुन्हेगार आणि पोलीस यांच्यात जवळपास ६२०० हून अधिक एन्काऊंटर झाले. तर १४ हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

या एन्काऊंटरमध्ये २,३०० हून अधिक आरोपी आणि ९०० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. तसेच, मोहिमांमध्ये १३ पोलीस शहीद झाले आहेत, तर पोलीस आतापर्यंत १२4 गुन्हेगार ठार झाले आहेत. या गुन्हेगारांची जातनिहाय माहिती पाहिल्यास ४७ अल्पसंख्यक, ११ ब्राह्मण, ८ यादव आणि उर्वरित ५८ ठाकूर, मागासवर्गीय आणि अनसूचित जाती / जमातींच्या गुन्हेगारांचा समावेश आहे.

आणखी बातम्या...

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

Web Title: yogi government up police encounter policy asaduddin owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.