उत्तर प्रदेशात 'योगी' सरकार, उद्या शपथविधी
By admin | Published: March 18, 2017 06:06 PM2017-03-18T18:06:32+5:302017-03-18T18:58:38+5:30
उत्तरप्रदेश निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री कोणाल करायचं हा भाजपासमोरचा पेच सुटला असून योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने सर्व शक्यता फेटाळत योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शनिवारी आमदारांच्या बैठकीनंतर औपचारिकता म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्यांची निवड करण्यात आली. योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपाच्या हिंदुत्व राजकारणाचा चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांना ओळखलं जातं.
योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेश राजकारणातील प्रभाव लपून राहिलेला नाही. गोरखपूरमध्ये नाहीतर संपूर्ण उत्तर प्रदेशातील दिग्गजांमध्ये त्यांचा समावेश आहे. ते राज्यातील एक बडे लोकनेता असून गोरखपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात त्यांचा प्रचंड दबदबा आहे.
योगी आदित्यनाथ आणि वाद -
शनिवारी दुपारी उत्तर प्रदेशमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या. केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारी वृत्त मागे पडू लागली. पक्षाने योगी आदित्यनाथ यांना चार्टर्ड विमानं दिल्लीला बोलावलं होतं. तर केशव मौर्य यांची देखील अमित शाह यांच्याशी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी चर्चा झाली. दुपारी योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य जेव्हा विशेष विमानाने लखनऊला पोहोचले तेव्हा पक्ष हायकमांडने योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होतील हा दिलेला संदेशही पोहोचला होता.
#WATCH Yogi Adityanath chosen as Uttar Pradesh BJP legislature party leader pic.twitter.com/OPnuON4BTg
— ANI (@ANI_news) March 18, 2017
भाजपा आमदारांच्या बैठकीआधी योगी आदित्यनाथ, भुपेंद्र यादव, ओम माथूर, के पी मौर्या आणि सुनील बन्सल यांच्यात एक वेगळी बैठक देखील पार पडली. सुरुवातीला राजनाथ सिंह यांची मनोहर पर्रीकरांप्रमाणे राज्यात बदली करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राजनाथ सिंह यांनी ही शक्यता फेटाळली होती. याआधी भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी चेहरा समोर आणेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
राजनाथ सिंह शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर मनोज सिन्हा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र दिल्लीहून परतलेल्या योगी आदित्यनाथ यांनी अचानक एंट्री मारत सर्व चित्रच पालटलं. उद्या योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी पार पडेल.