योगी सरकारचा मोठा निर्णय; श्रीकृष्ण जन्मस्थळा भोवतीचा 10 km परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 04:20 PM2021-09-10T16:20:02+5:302021-09-10T16:21:43+5:30
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मथुरेत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. या पार्श्वभूमिवर तीर्थक्षेत्र घोषित करण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या योगी आदित्यनाथांनी श्रीकृष्ण जन्मस्थळी पोहोचून भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले होते.
मथुरा - उत्तर प्रदेशातील योगी सरकारने शुक्रवारी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जन्मस्थळाच्या 10 चौरस किलोमीटरच्या परिघाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या भागात 22 नगरपालिका प्रभाग क्षेत्रे आहेत, ते तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. (up yogi govt declares 10 sq km around krishna janmasthal as tirthsthala)
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मथुरेत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. या पार्श्वभूमिवर तीर्थक्षेत्र घोषित करण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या योगी आदित्यनाथांनी श्रीकृष्ण जन्मस्थळी पोहोचून भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले होते.
PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने
मथुरेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते, पूर्वी आमदार आणि मुख्यमंत्री उत्सवानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथे येत नव्हते. तसेच, आधी मंदिरात जाण्यासाठी जे भीत होते, तेही आता राम माझे आहेत आणि कृष्णही माझे आहेत, असे म्हणत आहेत.
उत्तर प्रदेशात तीर्थ स्थळांच्या विकासाची कामे वेगात सुरू आहेत. अयोध्या, वाराणसी आणि मथुरा आदी ठिकाणच्या सुविधा पूर्वीच्या तुलनेत चांगल्या होत आहेत. राम जन्मभूमीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, आज तेथील राम मंदिराचे काम वेगात सुरू आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे बांधकाम 2024 पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय, वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट्सपैकी एक काशी विश्वनाथ कॉरिडोरवरही वेगात काम सुरू आहे.