यूपीत ‘योगी’राज पर्व, आदित्यनाथांनी घेतली शपथ

By admin | Published: March 19, 2017 02:00 PM2017-03-19T14:00:11+5:302017-03-19T15:06:48+5:30

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती यश संपादन केल्यानंतर भाजपाने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

Yogi raj festival in UP, Adityanath sworn in | यूपीत ‘योगी’राज पर्व, आदित्यनाथांनी घेतली शपथ

यूपीत ‘योगी’राज पर्व, आदित्यनाथांनी घेतली शपथ

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या 21 व्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांनी घेतली शपथ  आहे. उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती यश संपादन केल्यानंतर भाजपाने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशच्या 21 व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांनी तखनऊ येथे शपथ घेतली आहे. तर केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील 47 आमदारही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी, मनोज तिवारी शपथविधी सोहळ्याला हजर होते. विशेष म्हणजे सपाचे नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव हेही व्यासपीठावर दिसले.

उत्तराखंड मधील गढवाल या भागात 5 जून1972 रोजी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव अजय सिंह आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी ते लोकसभेवर निवडून गेले होते. 1998 रोजी लोकसभेत सर्वात तरुण खासदार होते. तेव्हापासून ते 2014 पर्यंत ते निवडून आले आहेत.

 

Web Title: Yogi raj festival in UP, Adityanath sworn in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.