'मर्डर'मध्ये योगींचं राज्य नंबर 1; सर्वाधिक गुन्हेही उत्तर प्रदेशात, महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 12:42 PM2017-12-01T12:42:21+5:302017-12-01T12:46:51+5:30
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गुरूवारी एका पत्रकाराची हत्या करण्यात आली. मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून पत्रकाराची हत्या केली. येथे नोव्हेंबर महिन्यात दुस-यांदा पत्रकाराची हत्या झाली. दुसरीकडे, राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध झाला आहे . यानुसार 2016 मध्ये अपेक्षेप्रमाणे देशातील सर्वाधिक जास्त हत्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षी खूनाच्या येथे सर्वाधिक 4,889 घटना घडल्या आहेत. त्या खालोखाल बिहारचा नंबर आहे, येथे 2 हजार 581 खून पडले.
- सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंदही उत्तर प्रदेशात-
देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंदही उत्तर प्रदेशातच झाली आहे. 2016 मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी आहे. 2015 मध्ये हीच संख्या 47 लाख 10 हजार 676 इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 लाख 82 हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
- राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा-
महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे 217 इतके आहे.