योगी सरकारला 1 महिना पूर्ण, महिन्याभरात घेतले धडाकेबाज निर्णय

By admin | Published: April 19, 2017 04:48 PM2017-04-19T16:48:18+5:302017-04-19T16:51:03+5:30

19 मार्च रोजी योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सूत्रं हाती घेतली. आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे.

Yogi Sarkar completes 1 month, striking decisions taken during the month | योगी सरकारला 1 महिना पूर्ण, महिन्याभरात घेतले धडाकेबाज निर्णय

योगी सरकारला 1 महिना पूर्ण, महिन्याभरात घेतले धडाकेबाज निर्णय

Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 19 - उत्तर  प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत राज्यात आपली सत्ता स्थापन केली.  19 मार्च रोजी योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सूत्रं हाती घेतली. आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे.  मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर योगींनी बरेच धडाकेबाज निर्णय घेतले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी योगी सरकार आणि त्यांचं मंत्रिमंडळ कामाला लागले आहे. 
 
अवैध कत्तलखान्यांवरील कारवाई, रस्त्यांच्या समस्या, सरकारी कार्यालयांत गुटखा खाण्यावर बंदी यांसारखे धडाकेबाज निर्णय आदित्यनाथ यांनी घेतले. योगी यांनी सुरुवातीला अधिकारी वर्गात कोणतेही बदल न करण्याचे संकेत दिले होते. मात्र, सरकारचा एक महिना पूर्ण होण्याआधीच त्यांनी जवळपास 40 हून अधिक अधिका-यांची बदलीदेखील केली.  यात आयएएस अधिकारी नवनीत सेहगल आणि रमा रमण यांच्यासहीत 20 अधिका-यांचा समावेश होता. 
 
योगी सरकारकडून घेण्यात आलेले धडाकेबाज निर्णय
1. शेतक-यांना कर्जमाफी 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या एक लाखापर्यंतच्या कर्ज माफीची घोषणा केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे ३० हजार ७२९ कोटींचे कर्ज माफ होणार असून, बुडीत कर्ज धरून एकूण ३६ हजार ३५९ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. या कर्जमाफीचा लाभ उत्तर प्रदेशमधील ८६ लाख लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश सरकारनं ३६ हजार ३५९ कोटींची तरतूद केली आहे.
 
2. अवैध कत्तलखान्यांवर बंदी
मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती आराखडा आखण्याचा आदेश दिला. या कारवाईत शेकडो अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले. याविरोधात मांस विक्री करणा-यांनी निदर्शनंही केली.   
 
3. अॅन्टी रोमियो स्क्वॉड
महिला-तरुणींविरोधात वाढणारे अत्याचार, गुन्हे लक्षात घेऊन योगी आदित्यनाथ यांनी अॅन्टी रोमियो स्क्वॉडची स्थापना केली. महिलांसोबत होणा-या छेडछाडीच्या घटनांना चाप लावण्यासाठी या स्क्वॉडची स्थापना करण्यात आली. 
 
4. सरकारी कार्यालयांमध्ये गुटख्यावर बंदी
योगी सरकारने सत्तेत येताच सरकारी कार्यालयांमध्ये पान-गुटखा खाण्यावर बंदी घातली. सोबत प्लास्टिकच्या वापरावरही रोख आणण्यात आली.  योगी आदित्यनाथ जेव्हा सचिवालय परिसरात पोहोचले होते तेव्हा त्यांना तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसली. जागोजागी गुटखा आणि तंबाखू खाऊन केलेल्या घाणीवर त्यांनी संताप व्यक्त केला. यावर भडकलेल्या योगींनी सरकारी कार्यालयांत गुटखा खाण्यावर बंदी आणली. 
 
5. खड्डेमुक्त रस्ते
15 जूनपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.  
 
6. वीज पुरवठा
2018 पर्यंत 24 तास वीज पुरवठा करण्यात येणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली. कॅबिनेटच्या दुस-या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. 

 

Web Title: Yogi Sarkar completes 1 month, striking decisions taken during the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.