योगी मोदींपेक्षा श्रेष्ठ, त्यांनी पंतप्रधान व्हावे- रामू
By admin | Published: March 26, 2017 05:05 PM2017-03-26T17:05:05+5:302017-03-26T17:05:05+5:30
वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत राहणा-या राम गोपाल वर्मांनी पुन्हा एकदा खळबळजनक ट्विट केलं आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत राहणा-या राम गोपाल वर्मांनी पुन्हा एकदा खळबळजनक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तुलना केली आहे. रामू ट्विटमध्ये म्हणाले, योगी आदित्यनाथ विलक्षण आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. मला आशा आहे की ते नक्कीच पुढचे पंतप्रधान होतील. तसेच दुस-या एका ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही लक्ष्य केलं आहे.
ट्रम्प जे काही प्राप्त करतील अथवा नाही ते मीडिया सुनिश्चित करेलच. तरीही अमेरिकेच्या राजकीय इतिहासात मोठा विनोद म्हणून ट्रम्प ओळखले जातील, असंही वादग्रस्त ट्विट रामूनं केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख करत केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा वाद क्षमत नाही तोच आणखी एक ट्विट करून राम गोपाल वर्मानं लोकांची नाराजी ओढवून घेतली होती. होळीच्या शुभेच्छा देताना त्याची संकुचित मनोवृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. वर्षातला हा एकमेव असा सण आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहण्याची मज्जा लुटू शकतात. तसेच एकमेकांना स्पर्श करू शकतात. कोणत्या देवानं कोणत्या राक्षसाचा वध केला हे मला माहीत नाही, मात्र असे बोल्ड क्षण ज्या राक्षसांमुळे निर्माण झाले आहेत त्यांचे मी आभार मानतो, असंही रामू म्हणाला होता.
'महिला दिनी' त्यांनी वादग्रस्त ट्विट करण्याची परंपरा कायम ठेवली होती. 'हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचा आदर्श समोर ठेवा आणि पुरुषांना आनंद द्या' असा अजब सल्ला रामूने महिलांना दिला होता. एवढेच नव्हे तर ' महिला दिनाला पुरुष दिन म्हणावे कारण महिलांपेक्षा पुरुषच हा दिवस जास्त साजरा करतात,' असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
Yogi Adityanath is fantastic ..I think he is better than Narendra Modi ..I hope he becomes the next prime minister
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 26, 2017
Whatever he achieves or not media will ensure that Trump will be remembered as the biggest joke in the entire history of American politics
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 26, 2017