योगींना मुख्यमंत्री पदावरुन हटवा, कोर्टात याचिका दाखल

By Admin | Published: May 17, 2017 05:33 PM2017-05-17T17:33:56+5:302017-05-17T17:33:56+5:30

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरुन बर्खास्त करण्यात यावे अशी याचिका अलहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Yogi was removed from the post of chief minister, petition filed in court | योगींना मुख्यमंत्री पदावरुन हटवा, कोर्टात याचिका दाखल

योगींना मुख्यमंत्री पदावरुन हटवा, कोर्टात याचिका दाखल

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. 17 - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरुन बर्खास्त करण्यात यावे अशी याचिका अलहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री स्वामी केशव प्रसाद मौर्य यांनाही त्यांच्या पदावरुन बरखास्त करण्यात यावे असे म्हटले आहे. या याचिकेवर अलहाबाद उच्च न्यायालयात 24 मे रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. संजय शर्मा या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी अटॉर्नी जनरल(भारत का महान्यायवादी) यांच्याशिवाय होऊ शकत नसल्यामुळे कोर्टाने अटॉर्नी जनरल यांना याबाबत नोटीस पाठवली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री स्वामी केशव प्रसाद मौर्य हे राज्यतील विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य नाहीत. भारतीय संविधानाच्या नियमानुसार असे असल्यास दोघेही सहा महिन्यापेक्षा आधिक आपल्या पदावर कार्यकरत राहू शकत नाहीत. योगी यांना मुख्यमंत्री पदावर कायम रहायचे असल्यास आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा/विधानपरिषदेची निवडणूक लढवून जिंकावे लागेल. मिळालेल्या माहिती नुसार योगी आदित्यनाथ आणि केशाव प्रसाद मोर्य राष्ट्रपती निवणुकीनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनंतर ते विधानसभा निवणूक लढवतील. 19 मार्च 2017 रोजी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तसेच केशव प्रसाद मोर्य यांना उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त केले होते. भाजपाने उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत 325 जागांवर विजय मिळवला आहे.

Web Title: Yogi was removed from the post of chief minister, petition filed in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.