योगी तुम्ही नमाज पठण करणार ? - आझम खान
By admin | Published: March 31, 2017 08:43 PM2017-03-31T20:43:09+5:302017-03-31T20:43:09+5:30
सुर्य नमस्कार आणि नमाज पठणाची तुलनाच होऊ शकत नाही. हे विधान करण्यामागे नेमका तुमचा हेतू काय ?
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 31 - सूर्य नमस्कार आणि नमाज पठणामध्ये साम्य आहे असे तुम्ही म्हणता, मग तुम्ही स्वत: नमाज पठण करणार ? असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी सूर्य नमस्कार आणि नमाज पठणामध्ये फार फरक नाही. सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिमांच्या नमाज पठणामध्ये साम्य असल्याचे विधान केले होते.
सुर्य नमस्कार आणि नमाज पठणाची तुलनाच होऊ शकत नाही. हे विधान करण्यामागे नेमका तुमचा हेतू काय ? असा प्रश्न आझम खान यांनी विचारला. आदित्यनाथांना नमाज पठणापासून कोणीही अडवणार नाही असे आझम खान म्हणाले.
सुर्य नमस्कार, प्राणायाम ही आसने मुस्लिम बांधवाच्या नमाज पठणाशी मिळती-जुळती आहेत. या दोघांना एकत्र आणण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. कारण काहीजणांना योगामध्ये नव्हे फक्त भोगामध्ये रस आहे असे विधान आदित्यनाथ यांनी केले होते.