"लव्ह जिहाद"चा संशय, योगींच्या कार्यकर्त्यांची दांपत्याला मारहाण

By admin | Published: April 12, 2017 06:20 PM2017-04-12T18:20:06+5:302017-04-12T18:22:07+5:30

हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून एका दांपत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Yogi's party workers' assault kills, suspected of "love jihad" | "लव्ह जिहाद"चा संशय, योगींच्या कार्यकर्त्यांची दांपत्याला मारहाण

"लव्ह जिहाद"चा संशय, योगींच्या कार्यकर्त्यांची दांपत्याला मारहाण

Next
>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 12 - हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून एका दांपत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुस्लिम तरुणाचे हिंदू तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते संतापले होते. यामुळेच कार्यकर्त्यांनी घरात घुसून तरुणाला मारहाण केली. इतकंच नाही तर दांपत्याला फरफटत पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेले. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर या दांपत्याविरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांवर कार्यकर्त्यांकडून दबावही टाकण्यात आला. 
 
(हिंदू मुलीवर प्रेम करणा-या "त्या" मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या)
 
पीडीत तरुणाने कार्यकर्त्यांनी मॉरल पोलिसिंगच्या नावे आपल्याशी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिंदू युवा वाहिनीशी जोडले गेलेले आहेत. पश्चिम भागात लव्ह जिहाद महत्वाचा मुद्दा असल्याचं ते याआधी बोललेदेखील होते. 
 
या दांपत्याचा धर्म वेगवेगळा आहे. हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घरमालकावरही कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. कारवाई व्हावी यासाठी कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. तरुणाकडून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 
 
घरमालकाने ज्यांना घर दिलं आहे ते दांपत्यांना भाड्यावर देतात असा आरोप कार्यकर्ते करत आहेत. अशा लोकांविरोधातही कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहे. 
 
हिंदू युवा वाहिनी एक हिंदुत्तवादी संघटना आहे. ज्याची स्थापना योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. एप्रिल 2002 रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर योगी आदित्यनाथ यांनी या संघटनेची स्थापना केली. नऊ वर्षात उत्तर प्रदेशातील 72 जिल्ह्यांमध्ये संघटनेता विस्तार झाला आहे. 
 

Web Title: Yogi's party workers' assault kills, suspected of "love jihad"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.