Sudhanshu Trivedi Reaction: जो शब्द बोललोच नाही, त्याबाबत तुम्ही वाद घालताय; सुधांशू त्रिवेदींची शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:18 PM2022-11-21T23:18:32+5:302022-11-21T23:20:20+5:30
अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राजकारणात एक गोष्ट असते, काय बोललो गेले यापेक्षा जास्त महत्वाचे आहे कोण बोलले आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, हिंदू, हिंदू धर्म आणि हिंदुत्वात आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाच्या सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अवमानना आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्याने स्वत:च्या बुद्धीबाबत विचार करावा, अशी टीका भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.
अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जे लोक बोलत आहेत, हे लोक शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला मानतात का? हिंदवी स्वराज्य बनविण्याची शपथ घेतली त्याला मानता? यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या साम्राज्य़ाचे नाव हिंदूपतपातशाही होते, तुम्ही मानता? नाही मानत, अशा शब्दांत भाजपाच्या सुधांशु त्रिवेदींनी विरोधकांवर प्रश्न उपस्थित केले.
भाजपाचे प्रवक्ते @SudhanshuTrived
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 21, 2022
यांनी आज हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपार आदर आहे व अनादर केल्याची शंका घेणं सुध्दा चुक आहे अशी भूमिका अहमदाबाद येथील पत्रकार परिषदेत मांडली. pic.twitter.com/JHByqgoChm
जो शब्द बोललाच नाही गेला, त्याबाबत तुम्ही वाद घालत आहात. लुटीयन्स दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत. औरंगजेबाच्या संपूर्ण परिवाराच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, शाहजहा रोड, औरंगजेब रोड, तुम्ही दगडावर काय लिहिलं आणि पुस्तकांमध्ये औरंगजेबाची प्रशंसा व महानता लिहिली, अशी टीका त्रिवेदी यांनी केली.
सुधांशू त्रिवेदी काय म्हणालेले?
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर एका वृत्तवाहिनीवर सुधांशू त्रिवेदी भाजपची बाजू मांडत होते. यातल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. 'सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. पण त्याकाळात अनेक जण प्रस्तावित फॉरमॅटमध्येच बाहेर निघण्यासाठी ब्रिटीशांना पत्र लिहायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिली, याचा अर्थ काय झाला?,' असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं.