तुम्ही डोळे झाकून बसलाय, काही पावलं का उचलत नाही? शेतकरी आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला फटकार
By बाळकृष्ण परब | Published: January 28, 2021 07:52 PM2021-01-28T19:52:18+5:302021-01-28T19:53:32+5:30
Farmer Protest : प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते.
नवी दिल्ली - तबलिगी जमात मरकज प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानेशेतकरी रॅलीचा उल्लेख केला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार या विषयावर डोळे झाकून घेतले आहेत का? काही करत नाही, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते.
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये तबलिगी जमातीबाबत प्रसारमाध्यमांनी केलेल्या वृत्तांकनाबाबत जमियत उलेमा ए हिंद आणि पीस पार्टीसह अन्य लोकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना २६ जानेवारीच्या घटनेवरही केली टिप्पणी केली. न्यायालयाने सांगितले की, काही वृत्तांवर नियंत्रण एवढेच महत्त्वपूर्ण आहे जेवढे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीच्या तपासणी करणे आवश्यक आहे. मला माहिती नाही की सरकार यासाठी डोळे बंद करून का आहेत.
सरन्यायाधीश म्हणाले की, फेक न्यूजमुळे हिंसा होत आहे. कुणाचे प्राण जातील, हे होता कामा नये. कुठल्याही वृत्तामुळे अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. दरम्यान, केंद्र सरकारने सर्वोच्य न्यायालयात शपथपत्र दाखल करत सांगितले होते की, प्रसारमाध्यमांनी जमातच्या मुद्द्यावर रिपोर्टिंग करण्यापासून रोखता येणार नाही. हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. मरकजबाबत बहुतांश रिपोर्ट चुकीचे नव्हते असेही सरकारने सांगितले.