आपण संरक्षणकर्ते आहोत, शांततेने तोडगा काढू - सेहवाग

By admin | Published: February 21, 2016 04:16 PM2016-02-21T16:16:46+5:302016-02-21T16:16:46+5:30

भारताचा माजी तडाखेबंद फलंदाज विरेंद्र सेहवागने जाट आंदोलकांना आरक्षणासाठी सुरु असलेले हिंसक आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे.

You are a protector, calmly resolve - Sehwag | आपण संरक्षणकर्ते आहोत, शांततेने तोडगा काढू - सेहवाग

आपण संरक्षणकर्ते आहोत, शांततेने तोडगा काढू - सेहवाग

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - भारताचा माजी तडाखेबंद फलंदाज विरेंद्र सेहवागने जाट आंदोलकांना आरक्षणासाठी सुरु असलेले हिंसक आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे. जाट समाजातील लोक संरक्षणकर्ते आहेत नष्ट करणारे नाहीत. त्यामुळे मी माझ्या सर्व बंधुंना हिंसा थांबवण्याचे आवाहन करतो. 
त्यांनी त्यांच्या मागण्या संविधानिक मार्गाने मांडाव्यात. आपण संरक्षणकर्ते आहोत, नष्टकर्ते नाहीत असे सेहवागने टि्वटरवरुन आवाहन केले आहे. सेहवाग स्वत: जाट आहे. आपण लष्करात, खेळांमध्ये अनेकदा देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. आपल्यामध्ये जो उत्साह, आवेश आहे त्याचा आपण देशाच्या भल्यासाठी विचार करु असे सेहवागने सांगितले. 
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाचे हिंसक आंदोलन सुरु आहे. अनेक जाट नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मात्र तरीही हरयाणाच्या अनेक भागांमध्ये हिंसक आंदोलन सुरु आहे. 

Web Title: You are a protector, calmly resolve - Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.