गुजरात निवडणुकांत आपने आणला भाजपच्या नाकात दम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:12 AM2022-11-29T06:12:18+5:302022-11-29T06:12:32+5:30

याचे कारण, फेब्रुवारी २०२१मध्ये झालेल्या सुरत महानगरपालिकेच्या निवडणुकीत दडलेले आहे. 

You brought breath in BJP's nose in gujarat election | गुजरात निवडणुकांत आपने आणला भाजपच्या नाकात दम

गुजरात निवडणुकांत आपने आणला भाजपच्या नाकात दम

googlenewsNext

शांतीलाल गायकवाड 
लोकमत न्यूज नेटवर्क
सुरत : सुरत जिल्ह्यावर आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून भाजपच्या नाकात दम आणला आहे. आपने जिल्ह्यात दिलेल्या १६ उमेदवारांपैकी, एकाने भाजपच्या दबावात येऊन उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप आपने केला. नुकतीच आपचे प्रदेशाध्यक्ष व कतारगामचे उमेदवार गोपाल इटालिया व लिंबायत मतदारसंघातील उमेदवार पंकज तायडे यांच्या सभांमध्ये घुसून दगडफेक करण्यात आली. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले. एवढेच नव्हे तर अरविंद केजरीवाल यांच्या होणाऱ्या सभेलाही परवानगी नाकारण्यात आली. याचे कारण, फेब्रुवारी २०२१मध्ये झालेल्या सुरत महानगरपालिकेच्या निवडणुकीत दडलेले आहे. 

सुरतमध्ये ३५ टक्के मतदार पाटीदार आहे. भाजपचा मतदार असलेला हा समाज आंदोलनामुळे बिथरला. आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेल सध्या भाजपमध्ये असला तरी आंदोलनाचे ब्रेन असलेले अल्पेश कथिरिया (वराछा) व गोपाल इटालिया (कतारगाम) हे दोघे या मतदारसंघातून लढत आहेत. 

यांच्या जागा धोक्यात...
n कतारगाममधून विद्यमान मंत्री मोरडिया व वराछातील भाजपचे माजी मंत्री किशोर भाई कनानी यांच्या जागा धोक्यात आहेत. 
n आपमुळे  पाटीदार मतांची सरळ विभागणी होऊ शकते.  आपने जातीचे गणिते लक्षात घेऊन दिलेल्या उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 
n पाटीदार मतांतील फूट टाळण्यासाठीच पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन पाटीदार बहूल चार मतदारसंघासाठी केले आहे.

Web Title: You brought breath in BJP's nose in gujarat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.