एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थ कसे बनवतात, हे पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 08:10 AM2019-11-25T08:10:07+5:302019-11-25T08:10:40+5:30
एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची आयआरसीटीसीने गांभीर्याने दखल घेतली आहे.
मुंबई : एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची आयआरसीटीसीने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार आता प्रवाशांना दिले जाणारे अन्नपदार्थ कशाप्रकारे बनविले जातात, यावर आयआरसीटीसह प्रवाशांनाही लक्ष ठेवता येणार आहे. त्यासाठी एक्स्प्रेसमधील जेवण बनविणाºया कोचमध्ये हाय डेफिनेशनचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थ आणि प्रवाशांच्या तक्रारी असे समीकरण बनत चालले होते. यामुळे प्रवासी व संबंधितांमध्ये वाद झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले होते. हे प्रकार रोखण्यासाठी तसेच यात नेमका दोष कोणाचा आहे, हे पुराव्यासह समोर यावे यासाठी अखेर इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने हाय डेफिनेशन कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले. आयआरसीटीसीच्या वतीने १६ बेस किचनमध्ये कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांत कैद होणारी प्रत्येक हालचाल एका मोठ्या स्क्रीनद्वारे प्रवाशांना पाहता येणार आहे.
या कॅमेºयांमुळे पदार्थ बनवताना कोणती काळजी घेतली जाते, तेथील जागा स्वच्छ असते का, यासह त्यात एखादे झुरळ जरी पडले तरी ते तत्काळ कॅमेºयात कैद होईल. यासह अन्नपदार्थ तयार करण्यात येणारी भांडी स्वच्छ आहेत की नाही, याची तपासणीही करता येईल, असे आयआरसीटीसीच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले. यासह कॅटरिंग सेवेमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशीनद्वारे देयक पद्धत सुरू करण्यात आली आहे.
कंत्राटदारांच्या कामावर बारकाईने लक्ष
आयआरसीटीसीने अन्नपदार्थातील गुणवत्ता वाढविण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासाठी एक नियमावली तयार केली आहे. आॅन बोर्ड कॅटरिंग सुविधा पुरविणाºया ४७ कंत्राटदारांना ही नियमावली पाठविण्यात आली आहे. यापैकी २४ कंत्राटदारांनी नियमावलीचे पालन केले नसल्याचे आढळून आले, तर उर्वरित २३ कंत्राटदारांच्या कामावरही आयआरसीटीसी बारकाईने लक्ष ठेवून आहे. मेनू कार्डमध्ये बदल करणे, प्रवाशांचा अन्नपदार्थांबाबत प्रतिक्रिया घेणे, पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशीनद्वारे देयक देणे अशा प्रकारच्या सुविधा त्यांना प्रवाशांना उपलब्ध करून द्यावा लाणार आहेत.