चूं...चें...चूं...चें...! तुम्ही बघितलाच नसेल ग्लॅमरस साध्वी हर्षाचा हा 'अजब' अंदाज! VIDEO पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:12 IST2025-01-15T12:11:15+5:302025-01-15T12:12:15+5:30
mahakumbh 2025 glamorous video instagram reels of sadhvi harsha viral on social media

चूं...चें...चूं...चें...! तुम्ही बघितलाच नसेल ग्लॅमरस साध्वी हर्षाचा हा 'अजब' अंदाज! VIDEO पाहून थक्क व्हाल
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. येथे देश-विदेशातील लोक संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. पण, येथील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे ती उत्तराखंड येथून आलेली साध्वी हर्षा. विशेष म्हणजे, ती या कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र तिच्या साध्वी वेशापेक्षाही, तिचे आणखी एक वेगळे रूपही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. एवढेच नाही तर, तीचे हे दुसरे रूप पाहून आपणही थक्क व्हाल...
व्हायरल होतोय व्हिडिओ -
खरे तर, साध्वी हर्षाने नुकताच दावा केला होता की, ती महामंडलेश्वर यांची शिष्या असून दोन वर्षांपूर्वी ग्लॅमरस जीवन सोडून पूर्णपणे सनातन संस्कृतीकडे वळली आहे. मात्र, तिचा गेल्या एक वर्षापूर्वीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ती ग्लॅमर टी-शर्ट परिधान करून 'दिल करता चूं चें चूं चें' गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि तुम्हाला साध्वी हर्षा काय म्हणते आणि काय करते यातील फरक दिसेल.
दोन वर्षांपूर्वीच सोडलीय ग्लॅमरची दुनिया...? -
दोन वर्षांपूर्वीच ग्लॅमरस जग सोडून सनातन संस्कृती स्वीकारल्याचा दावा करणाऱ्या हर्षाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे तिच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युजर्स तिच्यावर संतापले आहेत आणि हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत आहेत. साध्वी हर्षाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला हा एकच नाही तर असे अनेक व्हिडिओज अथवा रील्स सापडतील. मात्र, हर्षाने नुकतेच एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलताना आपल्याला साध्वी म्हणू नये असे म्हटले आहे.