तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही- नरेंद्र मोदी
By admin | Published: December 1, 2015 06:04 PM2015-12-01T18:04:57+5:302015-12-01T18:20:36+5:30
तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही, लोकामध्ये मतभेद घडवून आणण्यासाठी अनेक कारणे आहेत. पण आपण एकत्र रहाण्याची कारणे शोधली पाहिजेत असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
Next
ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही, लोकामध्ये मतभेद घडवून आणण्यासाठी अनेक कारणे आहेत. पण आपण एकत्र रहाण्याची कारणे शोधली पाहिजेत असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते राज्यसभेमध्ये राज्यघटनेवरील चर्चेमध्ये बोलत होते. देश चालवण्यासाठी समतेबरोबर ममतेचीही गरज आहे. देश आमच्याकडे बघतोय. आमच्या काही जबाबदा-या आहेत. त्या आम्हाला पूर्ण केल्या पाहिजेत असे मोदी म्हणाले.
आपल्या देशाचे संविधान आपल्यासाठी प्रेरणा असले पाहिजे. संविधानाचा संदेश येणा-या पिढयांपर्यंत पोहोचला पाहिजे. संविधान दिन साजरा करण्याचा उद्देश आपल्या आजच्या तरुण पिढीला देशाच्या महान नेत्यांविषयी जागरुक ठेवणे आहे. आज आपले संविधान आपल्यासाठी मार्गदर्शक आहे असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे
> डॉ. बाबसाहेब आंबेडकरानां भारतात औद्योगिकीकरण व्हावे असे वाटत होते
> जनतेला आपल्याकडून खूप आपेक्षा आहेत, त्या आपण पुर्ण केल्या पाहीजेत
> देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यास नाकारु शकत नाही
> शाळेत संविधानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी.