कमाई केली तुम्ही अन् बक्कळ पैसा सरकारने कमविला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 12:15 PM2023-04-05T12:15:28+5:302023-04-05T12:15:45+5:30
प्रत्यक्ष कर संकलन १६ टक्क्यांनी वाढले
लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्र सरकारला जीएसटीपाठाेपाठ प्रत्यक्ष कर अर्थात आयकर व व्यवसाय कराच्या माध्यमातूनही रेकाॅर्डब्रेक महसूल मिळाला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १६.६१ लाख काेटी रुपये एवढे प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात १७.६३ टक्के वाढ झाली आहे.
आयकर विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रत्यक्ष कर संकलन यंदा १४.२ लाख काेटी रुपये एवढे राहील, असा अंदाज अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला हाेता. त्यात सुधारणा करून १६.५ लाख काेटी रुपये एवढा अंदाज निश्चित करण्यात आला. त्यापेक्षाही जास्त संकलन झालेले आहे.
- ₹१९.६८ लाख काेटी कर संकलन
- ₹१६.६१ लाख काेटी परतावा
- ₹२.४१ लाख काेटी वाढ यावेळी झाली
- ₹१४.१२ लाख काेटी कर संकलन २०२१-२२
- ₹१०.०४ लाख काेटी २०२२-२३
- ₹८.५८ लाख काेटी २०२१-२२
- कार्पोरेट टॅक्स १६.९१% वाढ
आयकरात सर्वाधिक वाढ
वैयक्तिक आयकरामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. यावेळी त्यात २४.३३% वाढ नाेंदविली आहे.
वर्ष आयकर परतावा
२०२२-२३ ९.६ ३.०७
२०२१-२२ ७.७३ २.२३
(आकडे : लाख काेटी रुपये)
विक्रमी जीएसटी संकलन
सरकारला गेल्या आर्थिक वर्षात १८.१० लाख काेटी रुपयांचा जीएसटी मिळाला आहे. सरासरी १.५१ लाख काेटी रुपयांचा जीएसटी दरमहा प्राप्त झाला आहे.