धार्मिक भावना दुखावल्याचा आप आमदारावर गुन्हा दाखल
By admin | Published: July 4, 2016 04:29 AM2016-07-04T04:29:32+5:302016-07-04T04:29:32+5:30
पंजाबमध्ये धार्मिक भावना दुखावून दंगलींना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला
नवी दिल्ली : पंजाबमध्ये धार्मिक भावना दुखावून दंगलींना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पंजाबमध्ये यादव यांनी पवित्र कुराणची विटंबना केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रविवारी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष लोकांच्या भावनांशी खेळत असल्याचे स्पष्ट होते, असे म्हटले. भाजपचे नेते झफर इस्लाम म्हणाले की, हा प्रश्न धर्माशी संबंधित असल्यामुळे तो गंभीर आहे. केजरीवाल आणि त्यांचा पक्ष उघडा पडला आहे. लोकांच्या भावनांशी आणि त्यांच्या धर्माशी कसा खेळ केला जातो याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे, असे इस्लाम येथे म्हणाले. ‘आप’नेराजकारणाच्या नावावर आपण किती खालच्या दर्जाला जाऊ शकतो हे दाखविल्याचे जफर इस्लाम म्हणाले. (प्रतिनिधी)