आपण स्वत: हून भितीत जगतो
By admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:04+5:302016-03-15T00:34:04+5:30
मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.
Next
म जुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात. मी जळगावात त्या मुलीच्या लग्नाला नक्की येईन?मुली लग्न करून सासरी जातात. नंतर त्यांचे लग्न मोडल्यावर त्यांना घर नसते. बहिणाबाईंनी हे वास्तव आपल्या कवितेतून मांडले. तरी अजूनही परिवर्तन झाले नाही. मुली आपले घर बांधून नवरा आपल्या घरात केव्हा आणतील. जळगावातील एक मुलगी मला भेटली होती. तिने आपले स्वत:चे घर बांधून घरात नवरा आणायचा असे ठरविले आहे. मी तिच्या लग्नाला नक्की येईल... व तिच्या घरालाही भेट देईन. स्त्रिया धर्म, कर्मकांड, चाकोरीत अडकलेल्या दिसतात. यातून त्या केव्हा बाहेर पडणार, असा प्रश्नही मंजुळे यांनी उपस्थित केला. प्रेम करताना विचार करू नका...सौंदर्य दिसण्यावर नसते. ते असण्यावर असते. कुरूप म्हणजे वाईट, अशी मानसिकता आहे. पण अनेक कुरूप मुली यशस्वी, कौशल्यवान आहेत. प्रेम करा, प्रेम करण्यापासून कुणाला अडवू नका, जात पात पाहू नका... पण एकतर्फी प्रेम करू नका... अलीकडे अनेक मुली प्रेम करताना आडनाव, जात, शिक्षण हे तपासून घेतात. असे करून प्रेम होत नाही.., असेही मंजुळे गमतीने म्हणाले. दोन वेळच्या जेवणासाठी कामअनेकजण जे काम करतात ते आवडीने, मनापासून करतात, असे नाही. आपल्याला व्यवस्थित जगता यावे, दोन वेळचे जेवण, हा विचार असतो. श्रमाला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, असेही मंजुळे यांनी सांगितले.