तुम्ही बुडा किंवा मरा घरखरेदीदारांना पैसे परत करा - सर्वोच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2016 02:05 PM2016-09-07T14:05:00+5:302016-09-07T14:20:14+5:30
ज्या लोकांनी आपली मेहनतीची कमाई घर खरेदीमध्ये गुंतवली आहे. त्यांना बिल्डरची आर्थिक स्थिती खराब आहे म्हणून कुठलाही त्रास होता कामा नये.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - ज्या लोकांनी आपली मेहनतीची कमाई घर खरेदीमध्ये गुंतवली आहे. त्यांना बिल्डरची आर्थिक स्थिती खराब आहे म्हणून कुठलाही त्रास होता कामा नये. तुम्ही बुडा किंवा मरा त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. तुम्हाला घरखरेदीदारांचे पैसे परत करावेच लागतील अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात बिल्डरला निर्देश दिले.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए.के.गोएल यांच्या खंडपीठाने सुपरटेक बिल्डरला हे निर्देश दिले. सुपरटेक बिल्डरच्या नोएडातील गृहबांधणी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणा-या १७ गृहखरेदीदारांना चार आठवडयांच्या आत पैसे परत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले.
पुढच्या सुनावणीला १७ गृहखरेदीदारांचे पैसे परत केल्याचा चार्ट सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला निर्देश दिले. कंपनी आर्थिक खराब स्थितीचे कारण देऊन घरखरेदीदारांचे हक्क डावलू शकत नाही असे न्यायमूर्ती मिश्रा आणि गोएल यांनी सांगितले. नियमभंगामुळे सुपरटेकचा प्रोजेक्ट वादाच्या भोव-यात सापडला असून, १७ जणांना त्यांनी गुंतवलेले पैसे परत हवे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय घरबांधणी क्षेत्रातील अशा प्रकारांसाठी एक उदहारण ठरणार आहे.