"जीव द्यायला बस खाली जा, माझी 1.5 कोटींची कार...", माजी पंतप्रधानांची सून संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 15:30 IST2023-12-04T15:28:31+5:302023-12-04T15:30:46+5:30
भवानी रेवन्ना एका बाईकस्वारासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. बाईकस्वाराने त्यांच्या कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

फोटो - आजतक
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची सून आणि एचडी रेवन्ना यांची पत्नी भवानी रेवन्ना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये भवानी रेवन्ना एका बाईकस्वारासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. बाईकस्वाराने त्यांच्या कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
भवानी रेवन्ना व्हिडीओमध्ये बाईकस्वाराला त्याच्या कारचं नुकसान झालं म्हणून बसखाली जाऊन जीवे दे असं सांगताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्या तिथे उपस्थित लोकांवर आपला राग काढताना दिसत आहे. कारची किंमत 1.5 कोटी आहे. कारचं नुकसान आता कोण भरून देईल? असा सवालही विचारला आहे.
भवानी रेवन्ना यांनी त्यांच्या दीड कोटी रुपयांची कारचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. तर स्थानिक लोक बाईकस्वाराच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. जेडीएस नेत्या भवानी रेवन्ना यांची कार आणि बाईकमध्ये टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर भवानी रेवन्ना यांचा चालक मंजुनाथ याने बाईकस्वार शिवन्नाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी धडक देणाऱ्या बाईकस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. म्हैसूर जिल्ह्यातील सालिग्राम पोलीस ठाण्यात बाईकस्वाराच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र जोरादार व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे.