तुम्ही बोला... नाहीतर ‘ती’ मरेल; भाषा नष्ट होण्याचा गंभीर धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:11 AM2024-02-06T07:11:09+5:302024-02-06T07:11:37+5:30
संबंधित संस्कृती आणि ज्ञान नष्ट होण्याचा गंभीर धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरात सध्या ७,१६८ भाषा बोलल्या जातात. परंतु यापैकी ४३ टक्के भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या भाषा बोलणाऱ्यांची संख्या आता हजारापेक्षा कमी झाली आहे. व्हिज्युअल कॅपिटलिस्टच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक ४० दिवसांनी एक भाषा नष्ट होत आहे. लुप्त होत असलेल्या भाषा या स्वदेशी समुदायांशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांची संबंधित संस्कृती आणि ज्ञान नष्ट होण्याचा गंभीर धोका आहे.
सर्वाधिक फटका कुठे?
nसध्या ८.८ कोटींपेक्षा अधिक लोक लुप्त होत असलेल्या भाषा बोलत आहेत. लुप्तप्राय भाषा म्हणजे मुले शिकत नाहीत किंवा वापरत नाहीत.
nओशनिया प्रदेशात लुप्तप्राय भाषांचे सर्वाधिक प्रमाण आहे. येथे ७३३ भाषांवर धोका आहे. त्याच वेळी, आफ्रिकेत ४२८ भाषा धोक्यात आहेत.
nविस्थापन, दुष्काळ आणि संघर्ष ही काही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे भाषा धोक्यात येण्याची शक्यता आहे
सर्वाधिक भाषा कुठे बोलल्या जातात?
सुमारे ८९ लाख लोकसंख्येसह, पापुआ न्यू गिनी हे जगातील सर्वात जास्त भाषांचे घर आहे. येथे एकूण ८४० भाषा बोलल्या जातात. भाषांच्या संख्येच्या बाबतीत इंडोनेशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप १० देशांमध्ये नायजेरिया, भारत आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
भाषा वाचवण्यासाठी काय केले जातेय?
माओरी : १९७०च्या दशकात, पाच% शाळकरी मुले माओरी भाषा बोलत होते. संवर्धनामुळे हे प्रमाण २५%वर गेले.
ओलेलो हवाई : शाळेत अनिवार्य केली. २०२३ मध्ये ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या १८,७००वर पोहोचली आहे.
एआयमधील प्रगती : एआयमधील प्रगती भाषा जतन करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.
४० दिवसांमध्ये एक भाषा मरतेय, अशी भाषांची जागतिक स्थिती आहे.
१०० वर्षांत जगभरातील ९० टक्के भाषा घसरणीचा दर असाच सुरू राहिल्यास नष्ट होण्याची भीती आहे.