तुम्हीही घेऊ शकता नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू; १४ सप्टेंबरला ई लिलावाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:42 AM2019-09-13T01:42:33+5:302019-09-13T01:42:47+5:30
शाली, चित्रे, सोने-चांदीचे रथ यांचा समावेश
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंची आॅनलाईन विक्री येत्या १४ सप्टेंबरला करण्यात येईल. नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरी या वस्तूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूू मांडल्या गेल्या आहेत. महागडी दुर्मिळ चित्रे, चांदी-सोन्याच्या भेटवस्तू शिवाय कलाकुसरीच्या वस्तू, शाली, पगडी फेट्यांची खरेदी सामान्यांना करता येईल. गॅलरीच्या संचालकांनी प्रत्येक वस्तूची किंमत ठरवली आहे. त्यापासुन पुढे बोली लावता येईल.
देशात तसेच परदेशात पंतप्रधान मोदींना अनेक भेटवस्तू मिळाल्या. या भेटवस्तू विकून त्यातून देशाच्या तिजोरीत पैसे जमा करण्याचा अभिनव विचार पंतप्रधानांनी केल्यावर सांस्कृतिक मंत्रालयास तशी सूचना 'पीएमओ'ने केली.
वाराणसीच्या कलाकारांनी अत्यंत देखणी दोन चित्रे पंतप्रधानांना काढून दिलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महात्मा गांधींची जिवंत भासणारी प्रतिमा कॅनव्हासवर चितारण्यात आली होती. या दोन्ही चित्रांची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेत ही चित्रे सर्वाधिक महागडी आहेत. किमान सहा चांदीचे रथ, महाभारताच्या काळाची आठवण करुन देणारा श्रीकृष्ण-अर्जुन विराजमान असलेला सोन्याचा रथ, सोन्याचा मोर व ईशान्य भारतातील राज्यांनी दिलेल्या सुंदर पगड्याही महाग आहेत. असंख्य शाली, मूर्ती, चित्रे, वाद्ये मोदींना भेट मिळालीत. लोहापासून बनवलेला दणकट आरसादेखील मोदींच्या संग्रहात आहे. केरळमध्ये मोदींना तो भेट मिळाला होता. उत्तरेकडील राज्यांमध्ये शौर्य परंपरेचे प्रतीक असलेली अनेक शस्त्रेही मोदींना भेट मिळाली. तलवारी, गदा, धनुष्य बाण, पूजेचे साहित्य, देवी-देवतांच्या मूर्तीदेखील ई आॅक्शनमध्ये लोकांना खरेदी करता येती.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूत्रांनुसार १४ सप्टेंबरपासून ई लिलाव सुरु होईल. दिवसभर ही प्रक्रिया चालेल. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास मुदतवाढीचा निर्णय सांस्कृतिक मंत्रालय घेईल. १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीला वस्तू खरेदी करता येणार नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.