धक्कादायक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं अन्...; नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:02 PM2023-09-27T12:02:39+5:302023-09-27T12:12:10+5:30
एका लग्न समारंभात नाचणारा तरुण अचानक खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही.
गेल्या काही दिवसांपासून डान्स करताना, जिम करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरही असे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. राजस्थानमधील सिरोही येथेही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका लग्न समारंभात नाचणारा तरुण अचानक खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही.
पाली जिल्ह्यातील सोजत येथील रहिवासी पूरण सिंघाडिया हा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उदयपूरमध्ये कोचिंग घेत होता. सिरोही येथे एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी गेला होता. 24 सप्टेंबर रोजी लग्नसमारंभात संगीताचा कार्यक्रम सुरू होता. याच दरम्यान पूरण सिंघाडिया नाचत असताना अचानक खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये पूरण सिंघाडिया आणि एक महिला स्टेजवर नाचताना दिसत आहेत. तेवढ्यात एक मुलगा नाचत पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जात होता. मात्र दुसरा तरुण येऊन तेथून मुलाला घेऊन जातो. यानंतर पूरणने डान्स करण्याचा प्रयत्न करताच तो लगेच जागेवर कोसळला.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी पूरणला तातडीने उपचारासाठी सिरोही रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमवारी त्याचा मृतदेह पाली जिल्ह्यातील सोजत शहरात आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डान्सदरम्यान अचानक झालेल्या या मृत्यूचा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.