अजब प्रेम की गजब कहाणी! तरूणानं चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं विवाहित महिलेशी लग्न, पाहा Photo
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:12 AM2021-06-11T09:12:10+5:302021-06-11T09:20:29+5:30
बिहारमध्ये एका तरुणाने आधीच विवाहित असलेल्या महिलेशी चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर लग्न केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, संबंधित महिलेचे नाव अनु कुमारी, तर तरुणाचे नाव आशु कुमार असे आहे. (young man married a married woman in front of the toilet in a moving train)
पाटणा - आपण यापूर्वी लग्नासंदर्भात अनेक अनोखे किस्से ऐकले अथवा वाचले असतील, पण आज आम्ही आपल्याला जो किस्सा सांगत आहोत, असा किस्सा आपण यापूर्वी क्वचितच ऐकला किंवा वाचला असेल. समोर आलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील एका प्रेमी जोडप्याने अगदी अनोख्या अंदाजात चालत्या रेल्वेतलग्न केले आहे. (young man married a married woman in front of the toilet in a moving train in Bihar pictures went viral)
बिहारमध्ये एका तरुणाने आधीच विवाहित असलेल्या महिलेशी चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर लग्न केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, संबंधित महिलेचे नाव अनु कुमारी, तर तरुणाचे नाव आशु कुमार असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. मात्र, मुलीकडच्यांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न किरणपूर गावातील एका तरुणाशी करून दिले होते.
लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सासुरवाडीतून पळून गेली होती मुलगी -
मात्र, संबंधित मुलीने त्या तरुणाला पती मानण्यास नकार दिला आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती ससुरवाडी सोडून पळून गेली. सांगण्यात येते, की सासूरवाडी सोडल्यानंतर संबंधित मुलगी आपल्या प्रियकराला भेटली आणि तिने पतीला सोडत प्रियकरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
चालत्या रेल्वेत टॉयलेट समोरच लग्न -
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे सुल्लतानगंज रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि बेंगळुरूकडे जाणाऱ्या रेल्वेत चढले. यानंतर या दोघांनी कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता रेल्वेतील टॉयलेटसमोर लग्न उरकले. या अनोख्या लग्नाचे फोटो आता सोशल मेडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर आशु कुमारने सांगितले, की गावातील अनु कुमारी आणि आपले प्रेम होते. यासंदर्भात तिच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला घराबाहेर निघण्यास विरोध केला. यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी किरणपूर गावातील एका तरुणाशी तिचे लग्न लावले होते.