हृदयद्रावक! २४ वर्षांचा मुलगा डॉक्टरकडे गेला, क्लिनिकच्या बाहेर खाली कोसळला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:12 PM2024-09-04T12:12:46+5:302024-09-04T12:16:00+5:30
मन हेलावून टाकणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक तरुण डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर ठेवलेल्या बेंचवर बसतो आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू होतो.
मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मन हेलावून टाकणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक तरुण डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर ठेवलेल्या बेंचवर बसतो आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू होतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
चंदेरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शाहरुख मिर्झा असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तरुण अस्वस्थ झाला होता, छातीत दुखत होतं. त्यावर उपचार करण्यासाठी सोमवारी चंदेरी येथील सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पसमधील डॉ. पंकज गुप्ता यांच्या शासकीय निवासस्थानी गेला होता.
मध्य प्रदेश में युवक सीने में दर्द की शिकायत लेकर डॉक्टर से मिलने गया था, अचानक हार्ट अटैक से वह गिर पड़ा और उसकी मौत हो गई। यह पूरी घटना पास में लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। pic.twitter.com/qLpJygGhPH
— Rakesh kumar patel (@NanheRakesh) September 4, 2024
हा तरुण डॉक्टरांच्या घराबाहेरील बेंचवर बसला होता आणि काही सेकंदांनी तो बेंचवरून खाली पडला. डॉ.पंकज गुप्ता यांनी सांगितलं की, तो तरुण आमच्याकडे आला होता. दोन मिनिटंही झाली नाहीत आणि तो बेंचवरून पडला. आम्ही त्याला उचलून चंदेरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. जिथे ईसीजी करण्यात आला, मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
रविवारी रात्री शाहरुखच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या, अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे उपचारासाठी आला. मात्र डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच हॉस्पिटलबाहेरच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण हार्ट अटॅक असल्याचं सांगण्यात आलं.