प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण
By admin | Published: July 27, 2016 07:17 PM2016-07-27T19:17:47+5:302016-07-27T19:17:47+5:30
जळगाव: प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणीच्या वडीलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, इज्जतीचा प्रश्न म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देवून सोडून देण्यात आले.
Next
ज गाव: प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणीच्या वडीलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, इज्जतीचा प्रश्न म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देवून सोडून देण्यात आले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका नामांकित शाळेत शिक्षण घेणार्या तरुणीजवळ गेल्या तीन दिवसापासून मोबाईल होता.तो मोबाईल बुधवारी तिच्या पालकांच्या नजरेस पडला. त्याबाबत तिला जाब विचारला असता तिने एका तरुणाचे नाव सांगितले. त्यानेच हा मोबाईल दिल्याचे सांगितले, मात्र तो मैत्रिणीसाठी दिल्याचेही तरुणीने सांगितले. मोबाईल प्रकरणामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी संबंधित तरुणाला आर.आर.शाळेजवळ गाठले. शाळा सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. मुलीला त्रास देतो या कारणावरुन तिच्या वडीलांनी त्याची येथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत तरुण घायाळ झाला. संतापात काहीही घडना घडू शकते याचा अंदाज आल्याने काही लोकांनी तरुणाला सोडविण्याचा प्रयत्न केला तर काहींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन करुन माहिती दिली. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले.दोघांमध्ये प्रेमप्रकरणाची चर्चापोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तो तरुण व ती तरुणी दोघांमध्ये प्रेमप्रकरण फुलल्याची माहिती काही जणांनी पोलिसांना दिली, तर पालकांनी मात्र या गोष्टीचा इन्कार केला. यापूर्वीही तरुणाला तिच्या पालकांनी समज दिली होती असे सांगण्यात आले. मात्र दोघांमध्ये प्रेमप्रकरण होते की नाही ? याबाबत अधिकृपणे कोणीही सांगायला तयार नव्हते. मुलगा बारावी नापास झालेला आहे. घरची परिस्थिती साधारणच आहे. तर मुलीची आई व वडील दोन्हीही जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. मुलीच्या वडीलांनी तक्रार दिली तर मुलगाही मारहाणीची तक्रार देण्याच्या मानसिकतेत आला होता. शिवाय चौकशीत काय निष्पन्न होईल,हे सांगता येत नाही त्यामुळे कोणीही तक्रार दिली नाही. आपसात समजोता करुन वाद मिटवण्यात आला.