खिशात दमडी नसताना हा तरुण फिरला २४ राज्ये, इच्छा असेल तर मार्ग सापडतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:17 AM2017-09-21T04:17:21+5:302017-09-21T04:17:24+5:30
या तरुणाचं नाव आहे अंश मिश्रा. देशभ्रमंतीचं स्वप्न उराशी बाळगून या तरुणाने आतापर्यंत २४ राज्यांतून प्रवास पूर्ण केला आहे. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
या तरुणाचं नाव आहे अंश मिश्रा. देशभ्रमंतीचं स्वप्न उराशी बाळगून या तरुणाने आतापर्यंत २४ राज्यांतून प्रवास पूर्ण केला आहे. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. अलाहाबादचा हा २७ वर्षीय तरुण २२५ दिवसांपासून देशात फिरत आहे. दिवाळीपूर्वी आपली यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प त्याने केला आहे. एमबीए आणि एमसीए केल्यानंतर एका कंपनीत नोकरी केली. तिथे मन रमले नाही. स्वत: कॅम्पस रिक्रुटमेंटचे काम सुरूकेले. तो ३ फेबु्रवारी रोजी भारतभ्रमण करण्यास निघाला. तो सांगतो की, या काळात आपल्याला ट्रक ड्रायव्हर्सनी खूप साथ दिली. सुमारे १८०० ट्रक ड्रायव्हर्सकडून मी लिफ्ट घेतली. त्यांच्यामुळेच मी हा प्रवास पूर्ण करू शकलो. देशभ्रमंतीमागे तीन कारणे असल्याचे तो सांगतो. फिरण्यासाठी खूप पैसा लागतो हा भ्रम दूर करणे, मणिपूर, नागालँडसारख्या भागात जाणे सुरक्षित नाही ही भीती लोकांच्या मनातून दूर करणे आणि ट्रक ड्रायव्हर्स व ट्रान्सपोटविषयीची नकारात्मक मते आहेत ती दूर करणे.