स्मृती इराणींच्या कारचा पाठलाग करणाऱ्या तरुणांना जामीन
By admin | Published: April 2, 2017 10:30 AM2017-04-02T10:30:38+5:302017-04-02T10:30:38+5:30
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कारचा पाठलाग केल्याची घटना काल घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कारचा पाठलाग केल्याची घटना काल घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आज सकाळी जामीनावर मुक्तता करण्यात आली.
शनिवारी संध्याकाळी काही जणांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या वाहन ताफ्याचा पाठलाग केला होता. त्यानंतर पोलिसांनी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, हे सर्व तरुण महाविद्यालीय विद्यार्थी असून, ते दिल्ली विद्यापीठात शिकत असल्याचे समोर आले आहे. पाठलागाची घटना घडली तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते. वैद्यकीय तपासणीत या विद्यार्थ्यांनी मद्यपान केल्याचे उघड झाले. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना त्यांनी स्मृती इराणींच्या गाडीचा पाठलाग केला होता.
दरम्यान, स्वत: स्मृती इराणींनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. ही मुले ज्या गाडीत बसली होती ती गाडी आपल्या वाहन ताफ्याचा पाठलाग करुन ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती असे स्मृती इराणींनी तक्रारीत म्हटले होते.