रेल्वेतून पडल्याने तरुण गंभीर जखमी
By admin | Published: June 12, 2016 10:34 PM2016-06-12T22:34:51+5:302016-06-12T22:34:51+5:30
जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने रामसेवक द्वारकीप्रसाद पटेल (वय १८ रा.चंदेपरी, उत्तर प्रदेश) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता माहेजी स्टेशनजवळ अप काशी एक्सप्रेममधून तोल जावून खाली पडला.
Next
ज गाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने रामसेवक द्वारकीप्रसाद पटेल (वय १८ रा.चंदेपरी, उत्तर प्रदेश) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता माहेजी स्टेशनजवळ अप काशी एक्सप्रेममधून तोल जावून खाली पडला. पटेल या काशी एक्सप्रेसने (क्र.१५०१८) मुंबईला जात होता. त्याच्याजवळ फुलपुरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई कुर्ला) असे तिकीट होते. पायरीवर बसला असताना माहेजी स्टेशनजवळ त्याचा तोल गेला. त्यात खाली पडल्याने हातापायाला जबर जखम झाली. शरीराचाही काही भाग घासला गेला आहे. तरुण धावत्या गाडीतून पडल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रॅकमॅन सुरेश प्रकाश कांबळे व दिनेश सुरेश निकम यांनी त्याला सावरत स्टेशन मास्तर पारधी यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यांनी मुंबईकडून जळगावकडे जाणारी गितांजली सुपरफास्ट एक्सप्रेस थांबवून पटेल याला जळगावला रवाना केले. लोहमार्ग पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असला तरी त्याची प्रकृती स्थिर आहे.