्नरेल्वेस्थानकातून तरुणी बेपत्ता

By admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:37+5:302016-10-30T22:46:37+5:30

अहमदनगर : येथील रेल्वे स्थानकातून २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हापूर हजरत निजामोद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत असलेली तरुणी बेपत्ता झाली़ कुमकुम राजेंद्रकुमार मौर्या असे सदर मुलीचे नाव असून, ती हरीपूर, जलालबाद, उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे़ या घटनेची नगर रेल्वे पोलिसांनी नोंद केली असून, तपास सुरू केला आहे़

Young woman missing from locality | ्नरेल्वेस्थानकातून तरुणी बेपत्ता

्नरेल्वेस्थानकातून तरुणी बेपत्ता

Next
मदनगर : येथील रेल्वे स्थानकातून २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हापूर हजरत निजामोद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत असलेली तरुणी बेपत्ता झाली़ कुमकुम राजेंद्रकुमार मौर्या असे सदर मुलीचे नाव असून, ती हरीपूर, जलालबाद, उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे़ या घटनेची नगर रेल्वे पोलिसांनी नोंद केली असून, तपास सुरू केला आहे़

मारहाण करणार्‍या
दोघांवर गुन्हा
अहमदनगर : चेष्टा करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलास मारहाण करणार्‍या दोघा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी शेख फैमिदा कसीम यांनी फिर्याद दिली असून, फिर्यादीच्या मुलास शनिवारी रात्री ७ वाजता रोहित पवार व राजेश पवार यांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुचाकीच्या डिक्कीतून
५० हजारांची चोरी
अहमदनगर : सर्जेपुरा येथील पु़ना़ गाडगीळ शोरुमसमोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये लांबविले़ याप्रकरणी शाह कय्युम लिलाही यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़


विनापरवाना फटाके
विकणार्‍यावर कारवाई
अहमदनगर : मार्केट यार्ड चौकात स्टॉल लावून विनापरवाना फटाक्यांची विक्री करणार्‍या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ अमोल संतोष जैन याने शासकीय परवाना व सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान शहरात बहुतांशी ठिकाणी गेली चार ते पाच दिवस अनेकांनी विनापरवाना स्टॉल लावून फटाक्यांची विक्री केली़ पोलिसांचे मात्र त्याकडे लक्ष गेले नाही़

Web Title: Young woman missing from locality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.