ऑनलाइन गेम खेळण्यावरून लहान भावाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:27 AM2022-05-27T07:27:26+5:302022-05-27T07:27:59+5:30

गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील गोबलेज गावात हा प्रकार घडला

Younger brother brutally murdered while playing online games | ऑनलाइन गेम खेळण्यावरून लहान भावाचा निर्घृण खून

ऑनलाइन गेम खेळण्यावरून लहान भावाचा निर्घृण खून

Next

अहमदाबाद : मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्याच्या वादातून १६ वर्षीय मुलाने आपल्याच लहान भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 

गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील गोबलेज गावात हा प्रकार घडला. मागील सोमवारी दोन्ही भाऊ आलटून पालटून मोबाइलवर गेम खेळत होते. ११ वर्षांच्या भावाने मोबाइल देण्यास नकार दिल्यानंतर मोठा भाऊ भडकला. यावेळी मोठ्या भावाने मोठा दगड उचलला व छोट्याच्या डोक्यात मारला. यात तो बेशुद्ध पडला. या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या मोठ्या भावाने तोच दगड लहान भावाच्या अंगाला बांधला व त्याला विहिरीत फेकून दिले. 

मुले न दिसल्यामुळे पालकांची शोधाशोध 
आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना दोन्ही मुले दिसली नाहीत. त्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहिली. शोधाशोध करून त्यांनी गावी फोन करून विचारले असता मोठा मुलगा तेथे गेल्याचे समजले. त्याला परत आणून लहान भावाबद्दल विचारल्यावर त्याने सर्व प्रकार सांगितला.

Web Title: Younger brother brutally murdered while playing online games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.