ओडिशाच्या चंद्रानी सर्वात तरुण खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:37 AM2019-05-26T04:37:18+5:302019-05-26T04:37:39+5:30

अवघ्या २६ वर्षाच्या बी टेक (मेकॅनिकल) असलेली आदिवासी तरुणी चंद्राणी मुरमू ही नव्या लोकसभेत प्रवेश करणारी सर्वात तरुण खासदार आहे.

The youngest person in Orissa's Chandra district | ओडिशाच्या चंद्रानी सर्वात तरुण खासदार

ओडिशाच्या चंद्रानी सर्वात तरुण खासदार

Next

- अंबिका प्रसाद कानुनगो 
भुवनेश्वर : अवघ्या २६ वर्षाच्या बी टेक (मेकॅनिकल) असलेली आदिवासी तरुणी चंद्राणी मुरमू ही नव्या लोकसभेत प्रवेश करणारी सर्वात तरुण खासदार आहे. नोकरी शोधात असतानाच ओडिसाच्या आदिवासी बहुल असलेल्या किओंजर जिल्ह्यातील ही तरुणी आता संसदेत जात आहे. बँकेत अधिकारी अथवा एखाद्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करण्याचे चंद्राणीचे ध्येय होते. चंद्राणीचे वय २५ वर्ष आणि ११ महिने इतके आहे. तिला कधीच राजकारणात यायचे नव्हते. बिजू जनता दल या पक्षाकडून तिने निवडणूक लढविली आणि ती जिंकली. तिला ५,२६, ३५९ इतकी मते मिळाली आणि चंद्राणी मुरमू ही नव्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार बनली आहे. २0१७ मध्ये तिने बी टेकची पदवी घेतली.
>माझ्या जिल्ह्यातील विकास हे माझे प्राधान्य आहे. त्यासाठी मी लढत देईन.
- खा. चंद्राणी मुरमू
>महिला खासदार
724 एकूण रिंगणात, 78महिला विजयी लोकसभेच्या लढाईत यंदा 724
महिला उमेदवार रिंगणात उभ्या होत्या. त्यापैकी 78 महिलांना लॉटरी लागली.
>सर्वात कमी मार्जिन
181मतांनी विजयी
उत्तर प्रदेशातील मछलीशहर मतदारसंघात भाजपच्या बी. पी. सरोज उर्फ भोलानाथ यांनी बसपचे के. टी. राम उर्फ त्रिभुवननाथ यांच्यावर केवळ १८१ मतांनी विजय मिळवला

Web Title: The youngest person in Orissa's Chandra district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.