...तर तुमचे आधार कार्ड ठरेल निरुपयोगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 06:26 PM2018-02-06T18:26:01+5:302018-02-06T18:28:47+5:30
केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर तुमच्या आधार कार्डचा क्यूआर कोड काम करणे बंद करेल. तसेच आधार कार्डमधील तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते.
यूआयडीएआयने आधार कार्डच्या चुकीच्या प्रकारे होणाऱ्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर आधार कार्डमधील तुमची गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते अशी भीती यूआयडीएआयने व्यक्त केली आहे. आधार कार्डचा एक वेगळा भाग आणि मोबाइल आधार पूर्णपणे वैध असल्याचेही यूआयईएआयने सांगितले. आधार स्मार्टकार्डच्या प्रिंटींगवर 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अनावश्यक असल्याचे यूआयईडीएआयचे म्हणणे आहे. प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी स्मार्ट कार्ड अनावश्यक असतात. त्यामुळे क्विक रिस्पॉन्स कोड काम करणे बंद करते. तसेच या प्रकारच्या अनधिकृत प्रिंटिंगमुळे क्यूआर कोड काम करणे बंद करू शकते.
वरील कारणांशिवाय तुमच्या मंजुरीशिवाय चुकीच्या व्यक्तींकडे तुमची माहिती जाऊ शकते, अशी माहितीही आधार एजन्सीकडून देण्यात आलेली आहे. यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे म्हणाले की, प्लॅस्टिकचे आधार स्मार्ट कार्ड पूर्णपणे अनावश्यक आणि निरर्थक आहे. मात्र सर्वसाधारण कागदावर डाऊनलोक करण्यात आलेले आधार कार्ड किंवा मोबाईल आधार कार्ड मात्र वैध असेल.
आता तुमचा चेहरा बनणार आधार
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे.
1 जूनपासून नवी सोय
‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व ‘आधार’ संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल. थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.