नोकरी, करिअर, सबकुछ; कॉमर्समध्ये करिअरच्या भरपूर संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 06:27 AM2023-07-16T06:27:02+5:302023-07-16T06:28:43+5:30
एंटरप्रेनरशिप : सध्याच्या काळातील सर्वांत जास्त पसंतीस उतरलेला करिअरचा मार्ग. येथे तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता.
संकलन : सुमंत अयाचित
चार्टर्ड अकाउंटंट : तुमच्यामध्ये विश्लेषणाची ताकद आहे, असाधारण तर्ककौशल्य आहे आणि नंबरबरोबर गाढ मैत्री झालेली आहे, तर मग अकाउंटन्सीचे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटच्या रूपात तुम्ही वित्तीय विश्लेषक आणि आणखीही बरेच काही होऊ शकता.
इन्व्हेस्टर बँकर : अनेक ग्राहकांना त्यांची संपत्ती वाढविण्यासाठी तुम्ही दिशादर्शन करीत असता.
चार्टर्ड फायनान्शिअल ॲनॅलिस्ट : जगात अत्यंत प्रतिष्ठित करिअरपैकी हे एक आहे. यासाठी तीन कठीण परीक्षा पास व्हाव्या लागतात.
ॲक्च्युअरी : तुमचे गणित, सांख्यिकी आणि व्यवसाय व्यवस्थापन उत्तम आहे, तर तुम्ही या क्षेत्रात उतरू शकता.
कॉस्ट अकाउंटंट : या करिअरमध्ये प्रॉफिटॅबिलिटी ॲनॅलिसिस, बजेट प्रिपरेशन, डेटा कलेक्शन व इतर कामांपुरतेच मर्यादित राहत नाहीत.
कंपनी सेक्रेटरी : कायदेशीर, वैधानिक आणि नियामक गरजेनुसार कंपनीला सल्ला देणे, कंपनीचे टॅक्स रिटर्न भरणे, आदी कामे करावी लागतात.
पर्सनल फायनान्शिअल ॲडव्हायजर : आपल्या क्लायंटचे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म फायनान्शिअल गोल्स पूर्ण करण्यात हे मदत करतात.
रिसर्च ॲनॅलिस्ट : ऑपरेशन्स, इकॉनॉमिक्स, इक्विटी आदी क्षेत्रांत यांना चांगली संधी आहे. मार्केटिंग, फायनान्स किंवा इकॉनॉमिक्सची पदवी पाहिजे असते.
मार्केटिंग : बारावीनंतर कॉमर्सचे विद्यार्थी मार्केटिंग क्षेत्रात प्रवेश करून आपला अनुभव वाढवू शकतात. डिजिटल मार्केटिंगचे सर्टिफिकेट व नंतर पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊनही करियर करता येते.
एंटरप्रेनरशिप : सध्याच्या काळातील सर्वांत जास्त पसंतीस उतरलेला करिअरचा मार्ग. येथे तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता.
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट : नवीन कर्मचाऱ्यांना शोधणे, त्यांची योग्यायोग्यता तपासणे व नोकरीवर घेणे, आदी कामे यात येतात.
याबरोबरच सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट (सीपीए), रिलेट मॅनेजमेंट, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए), प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सेल्स मॅनेजर, हॉटेल मॅनेजमेंट, बजेट ॲनॅलिस्ट, रिलेशनशिप मॅनेजर, ऑडिटर, स्टॉक ब्रोकर, स्टॅटिस्टिशियन, वकील, जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, डिजिटल मार्केटिंग, असे अनेक मार्ग निवडू शकतात.