तुमचा वैमानिक दारु पिऊन तर विमान चालवत नाही ना?
By admin | Published: May 10, 2016 11:49 AM2016-05-10T11:49:09+5:302016-05-10T11:57:49+5:30
गतवर्षी 2015मध्ये 43 वैमानिक उद्दाणाआधी केलेल्या तपासणीत दारुच्या प्रभावाखाली असल्याचं समोर आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 10 - विमानाने प्रवास करत असताना तुमचा वैमानिक दारु पिऊन तर आलेला नाही ना ? याची नक्की चौकशी करा. कारण गतवर्षी 2015मध्ये 43 वैमानिक उद्दाणाआधी केलेल्या तपासणीत दारुच्या प्रभावाखाली असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये जेट एअरवेज आणि इंडिगोच्या वैमानिकांची संख्या जास्त आहे.
2015 मधील ही संख्या तीन वर्षातील उच्चांक आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. यावर्षी आत्तापर्यत 13 वैमानिक दारुच्या प्रभावाखाली आढळले आहे.
भारतातील दुस-या क्रमांकाची विमान सेवा जेट एअरवेजमधील वैमानिक यामध्ये सर्वात जास्त असून 2013 पासून एकूण 38 वैमानिक मद्यप्राशन करुन आल्याचं आढळलं आहे. तर इंडिगोचे 25 वैमानिक मद्यपान करुन आल्याचं चाचणीत उघड झालं होतं.
कोणत्याही विमानाच्या उड्डाणाआधी नियमाप्रमाणे वैमानिकासह केब्रिन क्रूमधील सर्वांची चाचणी केली जाते. जर वैमानिकाने नियमाचं उल्लंघन केलं असेल तर पहिल्या वेळी तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो. दुस-यांदा उल्लंघन केल्यास तीन वर्ष आणि त्यानंतर परवाना कायमचा रद्द केला जातो.
हे अजिबात स्विकारलं जाऊ शकत नाही, हे निर्दयपणे हाताळलं पाहिजे असं मत एव्हिएशन एक्स्पर्ट्सनी व्यक्त केलं आहे. अनेक लोकांची जबाबदारी वैमानिकावर असते. हवेत असो वा जमिनीवर दोन्हीकडे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, एक छोटीशी चूक मोठं नुकसान करु शकते असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.