तुमच्या पाठिंब्यामुळेच विकासाला वेग मिळाला - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:04 AM2018-05-27T06:04:20+5:302018-05-27T06:04:20+5:30

चार वर्षांपूर्वी भारतात विकास घडवून आणण्यासाठी आम्ही जो प्रवास सुरू केला, त्याला गेल्या चार वर्षांत चळवळीचे रूप प्राप्त झाले असून, या प्रवासात प्रत्येक भारतीयाच्चा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आमच्या सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी देशातील जनतेसमोर नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या.

 Your support gave the development momentum - Prime Minister Modi | तुमच्या पाठिंब्यामुळेच विकासाला वेग मिळाला - पंतप्रधान मोदी

तुमच्या पाठिंब्यामुळेच विकासाला वेग मिळाला - पंतप्रधान मोदी

Next

नवी दिल्ली -  चार वर्षांपूर्वी भारतात विकास घडवून आणण्यासाठी आम्ही जो प्रवास सुरू केला, त्याला गेल्या चार वर्षांत चळवळीचे रूप प्राप्त झाले असून, या प्रवासात प्रत्येक भारतीयाच्चा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आमच्या सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी देशातील जनतेसमोर नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधानांनी देशातील जनतेचे आभार मानतानाच, तुमचा पाठिंबा व प्रेम यांमुळे देशाच्या विकासाचे काम करण्यासाठी आम्हाला ऊ र्जा मिळाली, असे सांगून, यापुढेही आपले सरकार हे काम असेच पुढे सुरू ठेवेल, असा दावाही केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त करतानाच, त्यांच्या सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या
विकास कामांची माहिती देणारा एक व्हिडीओही शेअर केला.
संध्याकाळी ओडिशातील कटकमध्ये जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस व एकूणच विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आमचे सरकार जनतेला बांधिल आहे, आमच्या मनात विकासाच्या प्राधान्याबद्दल अजिबात गोंधळ नाही, असे ते म्हणाले.
चांगले प्रशासन हे आमचे ब्रिदवाक्य आहे. काँग्रेसने त्यांच्या कारकीर्दीत जी कामे केली नाहीत, ती आम्ही गेल्या चार वर्षांत करून दाखवली, याचा मला अभिमान आहे. आमचा एकही मुख्यमंत्री भ्रष्टाचाराबद्दल तुरुंगात गेला नाही, भ्रष्टाचार आम्ही कधीच खपवून घेतला नाही आणि यापुढेही सहन करणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर जनतेने सातत्याने विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच इतक्या राज्यांत रालोआची सत्ता आहे, असे सांगून, ते म्हणाले की आम्हीही हा विश्वास सार्थ ठरवू

गरिबीचा आम्ही अनुभव घेतला

पूर्व व ईशान्येकडील राज्यांकडे काँग्रेसने कायमच दुर्लक्ष केल्याचा आरोप करून मोदी म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासूनच या राज्यांतील विकासाची फळे मिळू लागली आहेत. यापुढील काळात ती आणखी वेगाने मिळतील, अशी मला खात्री आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या तिघांनी गरिबी अनुभवली आहे. त्यांना गरिबांचे प्रश्न व दु:ख माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी आम्ही सारे लढत आहोत.

पुन्हा आम्हालाच बहुमत : सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी २0१९ च्या निवडणुकांतही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी खात्री व्यक्त केली. ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान मोदी रोज २१ ते २३ तास काम करतात. असा पंतप्रधान आतापर्यंत भारताला कधीच मिळाला नव्हता.

मोदी सरकारवर नापासचा शेरा

शीलेश शर्मा
नवी दिल्ली : केंद्रातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांचे भाजपा नेते तोंड भरून कौतुक करीत असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारच्या प्रगती पुस्तकावर नापास झाल्याचाच शेरा मारला. त्यांना, अ, ब, क, ड यापैकी कोणताही दर्जा देणे शक्य नसून, त्यांना एफ (फेल-नापास) हाच दर्जा देता येईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरले आहे, असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला. राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जारी केलेले मोदी सरकारवरील रिपोर्ट कार्डमध्ये कृषी, परराष्ट्र धोरण, इंधनाचे दर व रोजगार निर्मितीमध्ये मोदी सरकारला 'एफ' म्हणजेच 'फेल' झाल्याचा शेरा मारला.

केवळ घोषणा, जाहिरातबाजी
मोदी व त्यांचे सरकार केवळ घोषणाबाजी व जाहिरातबाजीमध्ये आघाडीवर
असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी हाणला. महत्त्वाच्या सर्व प्रश्नांवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पण भाषणबाजीने सरकारने लोकांना आकर्षित केले आहे. केवळ संभाषणातच ते चतुर वा अव्वल ठरले आहे, असेही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

आरोप खोटे असल्याचे
सिद्ध करुन दाखवा- सिंघवी
काँग्रेस नेत्यांनी सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरात पत्रकार परिषदांद्वारा काँग्रेसवर आकडेवारीनिशी टीका केली. मुंबईत पक्षाचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या आकडेवारीला भाजपाने आकडेवारीनेच उत्तर द्यावे, असे आव्हान दिले. आपण दिलेली आकडेवारी खरी असून, ती खोटी असल्याचे भाजपाने सिद्ध करावे, असे ते म्हणाले.
काँग्रेसने आज विश्वासघात दिन पाळला. त्या निमित्त काँग्रेसने सरकारने देशाची
कशी फसवणूक केली, हे सांगणारी पुस्तिका प्रकाशित केली. तसेच एक पोस्टरही जारी केली. कार्यकर्त्यांनी
विविध भागांत केंद्र व भाजपाच्या
विरोधात निदर्शने धरली, धरणे धरली
व काही ठिकाणी मोर्चेही काढले.

Web Title:  Your support gave the development momentum - Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.