Video: उभ्या-उभ्या वर्दी उतरवेल तुमची, वनरक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 02:18 PM2020-07-20T14:18:26+5:302020-07-20T14:20:02+5:30
वनरक्षक शेखर सिंह जंगलातच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन कायदा शिकवत होते, त्यावेळी कुणीतरी त्या घटनेचा व्हिडिओ शुट केला
कोरबा - छत्तीसगढच्या कोरबा येथील एका वनरक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शेखर सिंह रात्रे असे या वनरक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. बांबूच्या झाडाची कापणी करणाऱ्या वन अधिकाऱ्यास या वनरक्षकाने नियम व कायद्यांची बतावणी करून त्यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली.
वनरक्षक शेखर सिंह जंगलातच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन कायदा शिकवत होते, त्यावेळी कुणीतरी त्या घटनेचा व्हिडिओ शुट केला. त्यानंतर, समाजमाध्यमांमधून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कोबरा येथील बांकीमोगरा हल्दीबाडी येथील ही घटना आहे, वनरक्षक शेखरसिंह रात्रे यांनी प्रतिबंधित क्षेत्रात बांबूच्या झाडांची कापणी होत असल्याचे पाहिलं. त्यावेळी, कापणी करणाऱ्या मजुरांना यासंदर्भात माहिती विचारली, त्यावेळी वनक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन हे काम सुरु असल्याचं ते म्हणाले. त्यावर, शेखरसिंह यांनी तात्काळ काम थांबविले. त्यामुळे, वरिष्ठ अधिकारी मृत्युंजय शर्मा आणि अजय कौशिक यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच, रात्रे यांच्यावर अधिकार गाजविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, रात्रे यांनी वरिष्ठांना न जुमानता कायद्याची भाषा शिकवली.
तुम्ही साहेब असाल तुमच्या जागी, पण हे माझ्या क्षेत्रातील काम आहे, इथे गुन्हा घडत असेल तर तुम्ही गुन्हेगार आहात, असे म्हणत कोणाच्या आदेशावरुन ही कापणी होत असल्याचं शेखर यांनी विचारल. त्यावर, वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता आलं नाही. त्यामुळे शेखर यांनी पुन्हा वरिष्ठांना सुनावले.
हे जंगल आरक्षित आहे, येथे झाडाचं एक पानही कापण्यास परवानगी नाही. त्यामुळे मी कलम 26 अंतर्गत गुन्हा दाखल करत आहे. बांबू कापणीचा हा सिझन नसून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात ही कापमी होत असते. तुम्ही रेंजर असाल आपल्या जागी, पण येथील क्षेत्राचा मालक मी आहे? अशा शब्दात शेखर यांनी वरिष्ठांन तंबी दिले. तसेच, गुन्हेगार आहात, गुन्हेगारासारखे वागा, अन्यथा उभ्या-उभ्या तुमची वर्दी उतरवेल, असेही शेखर यांनी म्हटले.
ये बीट इंचार्ज हैं
— Ritesh Mishra (@riteshmishraht) July 18, 2020
किसी बात पे अपने सीनियर पे भड़क गया हैं
मुझे लगता है बिलासपुर फॉरेस्ट डिवीज़न का मामला है
मामला कुछ बांस की कटाई का है
लेकिन इस फॉरेस्ट गॉर्ड को सलाम है भाई
बहुत passionate जंगल और अपने काम के प्रति
(पूरा मामला नहीं मालूम ) pic.twitter.com/6rpvYDmZYf