आरएसएसच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत, भाजपा आमदार बरळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 12:42 PM2018-02-06T12:42:35+5:302018-02-06T12:43:51+5:30
हैदराबादमधील भाजपा आमदार टी राज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
भोपाळ- हैदराबादमधील भाजपाआमदार टी राज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत, असं वाद ओढावणारं विधान त्यांनी केलं आहे. आरएसएस एक अशी फॅक्टरी आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे आयकॉन तयार करते. मध्यप्रदेशात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार टी राजा सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
तुम्ही सगळ्यानी लवकरच तुमच्या जवळच्या आरएसएसच्या शाखेशी सलग्न व्हा, असं मी आवाहन करतो. जो कुणी हिंदून आरएसएसमध्ये सहभागी होत नाही तो एक सच्चा हिंदू नाही. तसंच तो राष्ट्राची सेवा करण्यासाठी असमर्थ आहे, असं भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी म्हंटलं.
भारतात राहणाऱ्या कुठल्याही धर्माच्या व्यक्तीने भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हंटलंच पाहिजे, नाहीतर ते देश सोडून जाण्यासाठी स्वतंत्र आहेत, असंही टी राजा यांनी म्हंटलं. दुनियेतील कुठलाही देश त्याच्या दुश्मन देशाची किंवा दहशतवाद्यांची प्रशंसा करू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.
इतर कुठलाही देश भारत मात की जय सहन करू शकत नाही पण भारतात असे लोक आहेत जे पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देतात व अफजल गुरूसारख्या दहशतवाद्यांची प्रशंसा करतात, असंही वक्तव्य टी राजा यांनी केलं आहे. जर हिंदूना समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी लव्हजिहादच्या विरोधात जागरूकता निर्माण करावी, असंही ते म्हणाले.