बदनामीमुळे केली तरुणाने आत्महत्या

By admin | Published: November 22, 2015 11:16 PM2015-11-22T23:16:28+5:302015-11-22T23:16:28+5:30

नशिराबाद : मित्रांकडून होत असलेला चोरीचा खोटा आरोप व बदनामीमुळे येथील विष्णू मंदीराजवळील रहिवाशी दीपक एकनाथ माळी (वय ३०) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हे कारण स्पष्ट झाले. दरम्यान, याप्रकरणी चेतन वसंंत किनगे, राजू पुंडलिक किनगे, गणेश पुंडलिक किनगे व दीपक वसंत किनगे या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youth committed suicide due to defamation | बदनामीमुळे केली तरुणाने आत्महत्या

बदनामीमुळे केली तरुणाने आत्महत्या

Next
िराबाद : मित्रांकडून होत असलेला चोरीचा खोटा आरोप व बदनामीमुळे येथील विष्णू मंदीराजवळील रहिवाशी दीपक एकनाथ माळी (वय ३०) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हे कारण स्पष्ट झाले. दरम्यान, याप्रकरणी चेतन वसंंत किनगे, राजू पुंडलिक किनगे, गणेश पुंडलिक किनगे व दीपक वसंत किनगे या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक याने शनिवारी संध्याकाळी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केली होती.चेतन यास नशिराबाद पोलिसांनी चोरीच्या गुन्‘ात अटक केली होती.तेव्हा त्याने चोरीत मला दीपक माळीची साथ होती असे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी गावात अफवा पसरवून दीपकची बदनामी केली होती. या नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत या चौघांच्या नावाचा उल्लेख आहे.
(सुसाईड नोट)

Web Title: Youth committed suicide due to defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.